प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर ) जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात...
प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले ( सर )
जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले . दि २० व २१ जाने २०२५ रोजी सलग दोन दिवस विद्यार्थ्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्नेहसंमेलन प्रमुख व उपप्राचार्य डॉ रविंद्र चौधरी यांनी दिली . पहिल्या दिवशी सकाळी ९ वा विद्यार्थ्यासाठी आनंदमेळावा भरविला गेला . त्यात विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल व खाऊगल्लीमुळे विद्यार्थी व प्राध्यापक वृंदाची खूप मोठी गर्दी झाली होती तसेच ११ वा पारंपारिक वेशभूषा व विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दुपारी १ वा मराठी व हिंदी , साऊथ चित्रपट गीत , देशभक्तीपर गीत एकपात्री प्रयोग , नाट्यछटा ,नृत्यांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम विद्यार्थ्याच्या सक्रिय सहभागाने मोठ्या जल्लोषात संपन्न झाला . तसेच २१ जाने रोजी सकाळी ९ वा काव्यवाचन व शेरोशायरी , चारोळी स्पर्धा व फिशपॉण्डसचा कार्यक्रम आयोजित केला होता . तसेच वार्षिक पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध सिनेअभिनेते व कवी संकर्षण कऱ्हाडे , संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे , उपाध्यक्ष ॲड निवृत्ती काळे ,सचिव दत्तात्रय थोरात , खजिनदार सौ कांताताई मस्करे , विश्वस्त ॲॅड अविनाश थोरवे व विश्वस्त मंडळ , गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे , अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी , प्राचार्य डॉ महादेव वाघमारे , स्नेहसंमेलन प्रमुख व उपप्राचार्य डॉ रविंद्र चौधरी , कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा प्रतिभा लोढा , पर्यवेक्षक प्रा समीर श्रीमंते , एमसीव्हीसी विभागप्रमुख प्रा कुंडलिक नेटके , प्रबंधक मनिषा कोरे व विविध विभागाचे प्रमुख व विद्यार्थी , पालक वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते .
शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य डॉ महादेव वाघमारे यांनी केली व तसेच यावर्षीचा 'गुणवंत व आदर्श प्राध्यापक पुरस्कार ' प्रा ज्ञानेश्वर सोनार व 'गुणवंत आदर्श प्राध्यापिका पुरस्कार ' सौ वर्षा आहेर तसेच आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार शेखर भास्कर यांना प्रमुख पाहुणे व संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते शाल , श्रीफळ व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्ष २०२४ - २५ करीता आदर्श विद्यार्थी कु सुजल कबाडी , आदर्श विद्यार्थीनी कु सिद्धी तलांडे , उत्कृष्ट खेळाडू कु गौरी पिंपळे , उत्कृष्ट एनसीसी कॅडेट कु विनायक दातखिळे , उत्कृष्ट एनएसएस स्वयसेवक विद्यार्थी कु विवेक लोहकरे , उत्कृष्ट एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थीनी कु संजना हिले तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन उत्कृष्ट वक्ता कु श्रावणी घुले , वरिष्ठ महाविद्यालयीन उत्कृष्ट वक्ता कु मयुरी खरात , उत्कृष्ट रांगोळी कलाकृती कु आर्यन परदेशी , उत्कृष्ट कलाकार कु सुर्यजा माने , गीत गायन प्रथम कु श्वेता गायकवाड , वैयक्तिक नृत्य प्रथम कु निकिता डोके , समूह नृत्य प्रथम कु कीर्ती बटवाल ग्रुप , एकपात्री अभिनय प्रथम अयान तिरंदाज व विशेष नृत्य कु कनिष्का व कश्मिता शेलार, पारंपारिक वेशभूषा कु सायली शिंदे ,कॉलेज किंग कु सुजल कबाडी , कॉलेज क्वीन कु सुर्यजा माने तसेच प्रत्येक वर्गातील प्रथम क्रमांकाच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला .
यावेळी प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध सिनेनाटय कलाकार , कवी संकर्षण कऱ्हाडे यांनी कॉलेज तरुणाईच्या मागणीनुसार आपल्या प्रसिद्ध कविता सादर केल्या . ' दोन मित्र ,आई, निवडणूक व 'राजकारण , टक्कल , पंढरीची वारी ' या कविता सादर करून उपस्थित मान्यवर मंडळी व विद्यार्थी , पालक वर्ग यांच्याकडून उत्स्फूर्त दाद मिळून संपूर्ण वातावरणात अनेक वेळा हश्शा पिकविला व काही विनोदी कवितांच्या सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांचे चेहेरे आनंदाने फुलून गेले .
चौकट :
'आजच्या तरुणाईने स्वतः ची आवड व छंद जोपासावी व आवडीनुसार करिअर निवडावे . ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकडे गुणवत्ता व कौशल्याची कमतरता नाही . फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते .आपले ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिक व सातत्यपूर्वक प्रयत्न करा . भविष्यातील येणारा काळ हा तुमच्यासाठी उज्वल यश नक्कीच येऊन येईल .
-अभिनेते , कवी संकर्षण कऱ्हाडे
COMMENTS