प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे राष्ट्रीय सेवा योजना,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट बेल...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे राष्ट्रीय सेवा योजना,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट बेल्हे,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,समर्थ लॉ कॉलेज,समर्थ इन्स्टिट्यूट फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव "युथ फॉर माय भारत" व "युथ फॉर डिजिटल लिटरसी" या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर राजुरी येथे ९ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये संपन्न होत आहे.
या हिवाळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या अभिनव उपक्रमाला जुन्नर चे तहसीलदार डॉ.सुनील शेळके यांनी सदिच्छा भेट दिली.
शासन निर्देशानुसार प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची मोबाईल द्वारे ई -पिक पाहणी व नोंदणी करणे बंधनकारक असून यापुढील सर्व अनुदान किंवा योजनांचा लाभ पिक पहाणी नोंदवली असेल तरच मिळणार आहे.त्यामुळे पीक पहाणी नोंदवणे गरजेचे आहे.
राजुरी गावांमध्ये ई-पीक पाहणी व नोंदणी करण्यासाठी सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या २७५ विद्यार्थ्यांच्या सहाय्याने ई -पिक पाहणी व नोंदणी करून घेतलेली आहे.राजुरी गावातील प्रत्येक मळा,शिवार,वाड्या-वस्त्यावर जाऊन विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करण्यात आले.या विद्यार्थ्यांनी एकूण ११७६ शेतकऱ्यांच्या पिकांची ई-पिक पाहणी केली व ऑनलाईन पद्धतीने ऍप द्वारे नोंदणी या विद्यार्थ्यांच्या मार्फत करण्यात आली.
या ई-पीक पाहणी-नोंदणी करण्यासाठी राजुरी गावचे तलाठी धनाजी भोसले,नितीन औटी,सचिन औटी,अनिल औटी,विनोद ताजवे यांनी विद्यार्थ्यांना ई-पीक नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी केलेला हा एक अभिनव उपक्रम असून केलेले काम हे कौतुकास्पद व गौरवास्पद असल्याचे उदगार तहसीलदार डॉ.सुनील शेळके यांनी काढले.
सदर ई-पिक नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याने राजुरी गावातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजना,नुकसान भरपाई,शासन अनुदान,सोसायटी कर्ज, बँक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार असल्याचे तहसीलदार डॉ.सुनील शेळके यांनी सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी ई -पिक नोंदणी तसेच यांसारख्या अनेकविध योजना ग्रामपंचायत राजुरी च्या सहकार्याने आम्ही राबवणार असल्याचे युवा नेते वल्लभ शेळके यांनी सांगितले.
ई-पीक पाहणी व नोंदणी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी गावच्या सरपंच प्रियाताई हाडवळे,उपसरपंच माऊलीशेठ शेळके,माजी सभापती दिपक शेठ औटी,तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश औटी,ग्रामपंचायत सदस्य शाकीरभाई चौगुले,रंगनाथ पाटील औटी,अंकुश हाडवळे,पत्रकार राजेश कणसे,स्वप्नील हाडवळे,गणेश हाडवळे,निलेश हाडवळे यांनी सहकार्य केले.
COMMENTS