प्रतिनिधी : शरद शिंदे सुराळे | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांसमवेत उत्साहात साजर...
प्रतिनिधी : शरद शिंदे
सुराळे | जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुराळे येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम विद्यार्थ्यांची प्रभातफेरी वाद्यांच्या गजरात काढण्यात आली . ग्रामपंचायत ध्वजारोहण उपसरपंच मा. ॲड. सचिन चव्हाण यांचे शुभहस्ते झाले तर प्राथमिक शाळा ध्वजारोहण पोलिस पाटील मा. अशोक खंडू मातेले यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी आपटाळे बीट शिक्षण विस्ताराधिकारी मा. संचिता अभंग प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी गावातील विविध पदाधिकारी, शासकीय कर्मचारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी मुंबई फ्रुट मार्केट व्यावसायिक मा. जिजाभाऊ मातेले हे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायत, सुंदर लेझिम नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी अतिशय दर्जेदार भाषणे सादर केली. यावेळी श्री.राहूल अर्जुन मातेले यांच्या वतीने आपले पिताश्री कै.अर्जुन शिवराम मातेले यांचे स्मरणार्थ ठेवलेल्या ठेवीतून गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले. आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ मातेले बंधुंनी भिमाई फाऊंडेशन च्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा वह्यांचे वाटप केले. तसेच यावेळी विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शाळेतील नियोजित सभागृह बांधण्यासाठी विविध ग्रामस्थांनी व ग्रामस्थ मंडळाने सुमारे ३ लक्ष रुपयांचा मदतनिधी जाहीर केला. तसेच शाळा सुधार साठी १० हजार रुपये निधी रोख स्वरुपात जमा झाला. यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी संचिता अभंग मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. ग्रामस्थांचा लोकसहभाग, भौतिक सुविधा, परसबाग, वृक्षारोपण, शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांची भोजनाची व्यवस्था दानशूर ग्रामस्थ शिवशंभो किराणा प्रोपा.श्री. प्रकाशशेठ तुकाराम मातेले व कृषी उद्योजक श्री. राहुल पोपट मातेले यांनी केली. त्यानंतर सांस्कृतिक महोत्सव २०२५ कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर सुंदर नृत्य सादरीकरण केले. ग्रामस्थांनी भरभरुन बक्षीसे देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. भव्य स्टेज, मंडप, साऊंड सिस्टीम व सुंदर रांगोळी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
याप्रसंगी माजी विद्यार्थीनी क्षितिजा मातेले, श्री. अंकुश मातेले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बन्सी चतुर, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष रामदास चतुर, उपसरपंच ॲड. सचिन चव्हाण व कार्यक्रमाचे अध्यक्ष जिजाभाऊ मातेले यांनी मनोगते व्यक्त केली. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष शेटे व सर्व सदस्य, आजी माजी पदाधिकारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मुख्याध्यापक खंडेराव ढोबळे, आभार व नियोजन पदवीधर शिक्षक पंढरीनाथ उतळे, सर्व व्यवस्था उपशिक्षिका मंगल मरभळ व सुनिल डोळस, ग्रामसेविका अश्विनी आजादे, अंगणवाडी ताई शिलाताई मातेले, गीताताई शेटे यांनी केली. ग्रामस्थांनी सर्व शिक्षकांचा चांगल्या कामाबद्दल सत्कार केला.
COMMENTS