संरक्षण ऊद्योगातील कामगारांचे विविध समस्या, प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून खाजगी करण व कंत्राटीकरण ईतर मोठ्या प्रमाणात आव्हाने आहेत तसेच सरकार...
संरक्षण ऊद्योगातील कामगारांचे विविध समस्या, प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून खाजगी करण व कंत्राटीकरण ईतर मोठ्या प्रमाणात आव्हाने आहेत तसेच सरकारने यु पी एस एन पी एस (New pension scheme) बंद करून जुनीच पेंशन योजना सुरु करावीत अशी मागणी हाय एनर्जी मटेलीयल रिसर्च लॅबोरेटरी सुतारवाडी पाषाण पुणे (HEMRAL) येथे झालेल्या निदर्शने च्या वेळी भारतीय प्रतिरक्षा मजदूर महासंघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री महादेव हाके यांनी गेट मिटींग च्या वेळी केले आहे.
तसेच संरक्षण ऊद्योगातील आस्थापनां मध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार कार्यरत आहेत, या कामगारांना रोजगारात सुरक्षा, लागु असलेल्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ, भविष्य निर्वाह निधी योजना, राज्य कामगार विमा योजना, वेतना मध्ये सुरक्षा मिळाली पाहिजे, अनेक ठिकाणी कंत्राटी कामगारांच्या वेतन मधून वेगवेगळ्या मार्गांनी काही कंत्राटदार पैसे काढून घेतात, कामगारांवर आर्थिक अन्याय केला जातो. त्यामुळे कामगारांनी एकजुटीने न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी करिता भारतीय मजदूर संघ आवाज ऊठवणार आहे या करिता संघटीत व्हा असे आवाहन अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी गेट मिटींग च्या वेळी केले आहे.
भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने 15 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025 या कालावधीत संर्पुण देशभरातील संरक्षण ऊद्योगातील आस्थापनां समोर मागणी पंधरवडा च्या निमित्ताने निदर्शने करण्यात आली,
मागणी पंधरवडा च्या निमित्ताने दि 29 जानेवारी 2025 रोजी A R D E पाषाण व HEMRAL सुतारवाडी येथे निर्दशने करून येथील निदेशक श्री अनिल प्रसाद डॅश व A R D A चे वरिष्ठ अधिकारी श्री अंकित राजु यांना निवेदन देण्यात आले आहे.
भारतीय प्रतिरक्षा मजदूर महासंघ च्या महत्वपूर्ण मागण्या
1) नवीन पेंशन योजना बंद करून जुनी पेंशन योजना सर्व कामगारांना लागु करावी
2) अनुकंपा तत्त्वा वरील भरती प्रकीया 100% करण्यात यावी .
3) बेसुमार कंत्राटीकरण पध्दत बंद करून कायम स्वरूपी भरती प्रकीया सुरू करावी.
4) सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा .
5) पुर्वी च्या पध्दतीने 5 वर्षं नंतर प्रमोशन पाॅलीसी सुरू करावी.
6) 1जानेवारी 2026 पासून 8 व्या वेतनआयोग च्या सेवाशर्ती- भत्ते देण्यात यावे.
आस्थापनां समोरील मिटींग मधे ARDE संघटनेचे अध्यक्ष राजु काशीनाथन, श्री के एम तारू, जेसीएम 4 , श्री दिपक पवार उपाध्यक्ष यांनी नेतृत्व व मार्गदर्शन केले, व HEMRAL या आस्थापने मध्ये केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य श्री महादेव हाके, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे , नितीन काटे अध्यक्ष, श्री गजानन काटे सेक्रेटरी, श्री भरत कुंभार, संजय.... श्री मुरलीधर शिंदे योगेश देशमुख( जेसीएम 4 ) यांनी मार्गदर्शन केले आहे.
या वेळी मोठ्या प्रमाणात कामगार सहभागी झाले होते.
COMMENTS