नगरमार्गे पुण्याला जाणाऱ्या अमळनेर आगाराच्या एसटी बसने थेट पाठीमागून पुढच्या वाहनाला धडक दिल्याने सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. य...
नगरमार्गे पुण्याला जाणाऱ्या अमळनेर आगाराच्या एसटी बसने थेट पाठीमागून पुढच्या वाहनाला धडक दिल्याने सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात बसचे प्रचंड नुकसान झाले असून बसमधील प्रवासी सुदैवाने बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर पुणे बस क्रमांक एम एच २० बी एल २४०१ ही दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास नगरबायपास वरून जात असताना पुढच्या वाहनाला धडक लागली. या अपघातात बसचालक उमेश प्रकाश सोनवणे (वय 36, रा. शिरुड, ता. अमळनेर, जि. जळगाव) तसेच प्रवासी बंडू शांताराम पवार (वय 28), पूजा बंडू पवार (25), आर्यन बंडू पवार (वय 2 वर्ष, सर्व रा. खडकी, ता. चाळीसगाव, जि. जळगाव), लक्ष्मीबाई धोंड पाटील (वय 75, रा. पारोळा, ता. जळगाव), फातिमा बाबूमिया जहागीरदार (वय 70, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर), आयेशा शाकीर सय्यद (वय 30), अफजल शाकीर सय्यद (वय 9, दोघे रा. हडपसर, पुणे) असे जखमी झाले आहेत.
याबाबत ट्रेलरचालक समसाद खान (रा. छत्तीसगड) याने सोमवारी (दि. 6) सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक उमेश प्रकाश सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. समसाद खान हा ट्रेलर (सीजी 07 सीए 6138) घेऊन रविवारी दुपारी 3.30च्या सुमारास नगरहून पुण्याकडे जात असताना चास शिवारात पेट्रोल पंपासमोर पाठीमागून भरधाव आलेल्या अमळनेर ते पुणे एसटी बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस ट्रेलरवर आदळली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. नगर तालुका पोलिस व महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली.
COMMENTS