बिजापूर जिल्ह्यातील टीव्ही पत्रकार मुकेश चंद्राकर १ जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांची हत्या करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकला होता. या प्...
बिजापूर जिल्ह्यातील टीव्ही पत्रकार मुकेश चंद्राकर १ जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांची हत्या करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकला होता. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
पत्रकार मुकेश चंद्राकर १ जानेवारीपासून बेपत्ता होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम स्थापन करण्यात आली होती. मुकेश यांचा मृतदेह कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांची मालमत्ता असलेल्या ठिकाणी एका सेप्टिक टँकमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुकेश चंद्राकर हे नक्षलवादा संदर्भातील बातम्यासाठी संपूर्ण देशभरात ओळखले जात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढले होते. मुकेश यांचे स्वत:चे बस्तर जंक्शन नावाचे यूट्यूब चॅनल होते. एप्रिल २०२१ मध्ये बीजापूरमध्ये ताकलगुडा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात माओवाद्यांच्या कैदेत असलेले कोबरा कमांडो राकेश्वर सिंह मन्हास यांच्या सुटकेत मुकेश यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सुरेश चंद्राकर याचा भाऊ रितेशने पत्रकार मुकेश यांना एका ठिकाणी बोलवले होते. त्यानंतर त्यांचा फोन बंद होता. ३ जानेवारी रोजी मुकेश यांचा मृतदेह सुरेश चंद्राकर यांची मालमत्ता असलेल्या ठिकाणाहून मिळाला आहे. मुकेश यांनी कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांचे भ्रष्टाचार समोर आणला होता. त्यांना बस्तरमध्ये १२० कोटी रुपयांच्या रस्ते निर्मितीचे काम मिळाले होते. मुकेश यांनी दिलेल्या या वृत्तानंतर सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.
COMMENTS