सोलापूर- राज्य शासनाच्या माहिती अधिकार कायद्याचा काही जन माहिती अधिकारी हे हवा तसा उपयोग करून माहिती अधिकार कार्यकर्ता आणि अर्जदारांना अप्र...
सोलापूर- राज्य शासनाच्या माहिती अधिकार कायद्याचा काही जन माहिती अधिकारी हे हवा तसा उपयोग करून माहिती अधिकार कार्यकर्ता आणि अर्जदारांना अप्रत्यक्ष वेतिस धरून कायदा बदनाम करत असल्याची उदाहरणे समोर येत असल्यामुळे माहिती अधिकार कायद्याची कडक आणि पारदर्शक अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासन स्तरावर यापुढे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र राज्य संविधान प्रचारक आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य संविधान प्रचारक आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या संघटनेची स्थापना करण्यात आली. यावेळी सातारा जिल्ह्यातील पाडळी( केसे) तालुका कराड येथील आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, दैनिक क्रांतिकारी जयभीम चे संपादक विश्वास मोहिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची कार्यकारिणी यावेळी निवडण्यात आली. यावेळी राज्याचे उपाध्यक्ष म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील असलम शेख यांची निवड करण्यात आली. तर महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्यातील परशुराम भगळे, राज्य सरचिटणीस म्हणून दीपक मोहिते अहमदनगर, निवास मोहिते याचबरोबर विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष यांची ही निवड यावेळी करण्यात आली.
यावेळी विश्वास मोहिते म्हणाले, माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदीनुसार ज्या कार्यालयातील जन माहिती अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल होईल, त्या जन माहिती अधिकाऱ्यांनी ठराविक कालावधीमध्ये माहिती उपलब्ध करून देणे किंवा त्या अर्जावरती पत्रव्यवहार करणे अपेक्षित आणि कायद्यातील तरतुदीनुसार बंधनकारक आहे. परंतु काही जन माहिती अधिकारी मुदतीत माहिती देत नाहीत आणि अपील करण्यास भाग पाडतात. कायदेशीर दृष्ट्या हे बरोबर असले तरी मात्र आल मुक्या धोरणामुळे ही माहिती आणून ठेवतात अशी बरीच उदाहरणे महाराष्ट्रात पाहावयास मिळत आहेत. अशा अडवणूक करणाऱ्या जन माहिती अधिकाऱ्यांच्या विरोधात द्वितीय अपीलमध्ये जशी दंडाची तरतूद आहे त्या स्वरूपात प्रथम आपली अधिकाऱ्याकडे अधिकार देण्यात यावेत अशी कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत राज्य शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कार्यशाळेबाबत बोलताना विश्वास मोहिते म्हणाले, अजूनही ज्या काही पक्षकरांची शासकीय दरबारी कामे अडवणूक होत आहेत त्याच ठिकाणी फक्त माहितीचा अधिकार कायद्याचा उपयोग केला जात आहें. कार्यकर्त्यांनी एवढ्यावरच न थांबता एखाद्या शासकीय कार्यालयात नागरिकांचे आढळून किंवा काही भ्रष्टाचार होत असल्याची शंका आल्यास त्या ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्याचा उपयोग करावा असे आवाहन करून लवकरच महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणार असल्याची माहिती ही यावेळी विश्वास मोहिते यांनी दिली. महाराष्ट्र राज्यातून यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS