प्रतिनिधी आंबेगाव : प्रा. अनिल निघोट ( सर ) गंगेवाडी तालुका आंबेगाव येथे प्रथम क्रमांकात अनेक बैलगाडा घाटात बैलगाडा प्रथम क्रमांकात आणुन ...
प्रतिनिधी आंबेगाव : प्रा. अनिल निघोट ( सर )
गंगेवाडी तालुका आंबेगाव येथे प्रथम क्रमांकात अनेक बैलगाडा घाटात बैलगाडा प्रथम क्रमांकात आणुन एक दिवसानंतर लगेच महाळुंगे पडवळ ला प्रथम व द्वितीय क्रमांकासह फायनलचा मानकरी ठरल्याने आनंद साजरा केला,अनेक घाटात प्रथम क्रमांकासह फायनल व घाटाचा राजा किताब पटकवणारा पैलवान जयेश सतीशमहाराज पोखरकर यांनी आपल्या लाडक्या शंभुबैलाची हार घालुन , घरच्या महिलांनी ओवाळुन फटाक्यांच्याआतषबाजीसह गाडामालकानं आनंदोत्सव साजरा करुन आपल्या गंगेवाडी गाव,चोरबाबा व शंभु बैलगाडा संघटनेचं नाव संपूर्ण पुणे जिल्हयात गाजवणारा गुणवान शंभु बैलानं पहिलवान जयेश सतीशमहाराज पोखरकर गंगेवाडी या गाडामालकाचं नाव पंचक्रोशीत केल्याने सगळा परीवार गाडाप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला. नुकताच सतीश पोखरकर यांनी तीस डिसेंबर ला शंभु ला विकत घेतले म्हणून मुलगा जयेश बरोबर शंभु बैलाचा तिसरा वाढदिवस पण भव्य स्वरुपात साजरा केला होता.
जवळपास शंभर बैलगाडा घाटात कोणत्याही खांदी बारी भिडवणारा,शिस्तीचा बादशहा शंभु फकड्या म्हणून तो संपूर्ण पुणे जिल्हयात नावाजला जात आहे.
गंगेवाडी, आडगाव,चांडोली, चासकमान,पिंपळवाडी, कोहिनकरवाडी,महाळुंगे पडवळ येथे प्रथम क्रमांक, पहिल्या दुसरया फायनल चा मानकरी तर कळंब येथे घाटाचा राजा ठरला.कैलासवासी आबाजी हिले, आर्यन फुडस् चे मच्छिंद्रशेठ टेमकर,बलमा ग्रुप संदिप आनंदा भोकसे कुरकुंडी,सेव्हन स्टार ग्रुप, जिगर बैलगाडा संघटना यांच्याबरोबर अनेक घाटात प्रथम क्रमांकात राहिलेल्या आपल्या लाडक्या शंभु बैलाचे तीन भव्य वाढदिवस ही पोखरकर कुटुंबाने साजरे केले.महाळुंगे पडवळ च्या भव्य बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांकासह द्वितीय क्रमांकात फायनलचा मानकरी ठरल्यानं आपल्या गंगेवाडी पारगाव येथील घरी फटाक्यांची आतषबाजी व शंभु बैलास हार आणि ओवाळून आनंद व्यक्त केला. यावेळी स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रा.सुरेखाताई निघोट यांनी सतीश पोखरकरांच्या पूर्वजन्मीचं पुण्य म्हणुन असा गुणी शंभु बैल मिळाला, ज्यानं पोखरकर कुटुंबियांचं असंच नाव वाढवत रहावे अशा सदिच्छा
दिल्या.यावेळी भाऊसाहेब पवार, प्रा.अनिल निघोट,रुषी पवार,साहिल बगाटे,सुमित पानसरे, वैभव पवार, दगडू पवार ,शुभम पवार, करण पवार, विराज पवार, गणेश कोळी,श्रेयस कोळी,आदित्य पोखरकर, सर्वेश पवार, प्रल्हाद मुसळे, साहिल पानसरे ऊपस्थित होते,चोरबाबा मित्र मंडळ गंगेवाडी बागलवाडी व शंभु बैलगाडा संघटनेचे बैलगाडा प्रेमी सर्वच मित्रपरिवार, अतुल पवार, झांबरशेठ पानसरे,सचिन पवार,हेमंत पोखरकर,विष्णू दरेकर, दत्ता पवार,अर्जुन पवार,स्वप्निल मोरे,प्रविण मोरे,समीर मोरे,अशोक पवळे,सोनु जाधव,दगडु पवार
यावेळी बैलगाडामालक शाहिर सतीशमहाराज पोखरकर प्रत्येक बैलगाडा घाटात बारी जुंपायला बरोबर असतात सर्वांचे आभार मानुन शंभु बैल आमच्या गोठयाची , बैलगाडा शर्यतीची शान व पोखरकर परीवाराचं नाव वाढवत असुन परमेश्वराने शंभु बैलाची देणगी दिल्याबद्दल मनापासून आभार मानले.
COMMENTS