मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त पीएम श्री जिल्हा परिषद भोरवाडी शाळेत गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर यांचे मार्गदर्शनाने शिबिर...
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त पीएम श्री जिल्हा परिषद भोरवाडी शाळेत गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर यांचे मार्गदर्शनाने शिबिराचे आयोजन करण्यात आले.सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार,गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे,जीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.लहू खैरे,पद्मश्री मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे डॉ.धोंगडे,आरोग्य उपकेंद्र येडगावच्या डॉ.काळे,रोटरी नारायणगाव हायवे अध्यक्ष गाडेकर,सरपंच सीमाताई भोर,उपसरपंच अजित नेहरकर,देविदास भोर,श्रीकांत मोरे यांनी विद्यार्थ्यांस मार्गदर्शन केले.
पोलीस अधिकारी महादेव शेलार यांनी "प्राथमिक शाळा ह्याच खरी मंदिरे असून त्यांच्या विकासासाठी सामुहिक प्रयत्नांची व लोकसहभागाची गरज असून शिक्षणातील भविष्यातील संधी ओळखून विद्यार्थी पालकांनी पूर्वतयारी करावी असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य,विविध सहकारी संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी,ग्रामस्थ,पालक,तसेच मंगेश मेहेर,रमाकांत कवडे,अशोक काकडे,रवींद्र वाजगे,जयश्री वायकर,अविनाश शिंगोटे,सोपानशेठ भोर,अंकुश भोर,मिलिंद औटी,सुनील घोडेकर,रंगनाथ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी "शाळेने विद्यार्थी विकास कृती आराखडा आखून उपक्रमांद्वारे भविष्यातील आदर्श नागरिक घडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे"अशी अपेक्षा व्यक्त केली.
शालेय सेंद्रिय परसबाग,औषधी वनस्पती,फळझाडे,संगणक शिक्षण,बालगीत मंच,कंपोस्ट खत निर्मिती,एक दिवस शाळेसाठी या उपक्रमांचे कौतुक करून पोलीस अधिकारी महादेव शेलार यांनी रुपये दहा हजार शाळा विकास निधी म्हणून व्यवस्थापनाकडे सुपूर्त केला.शाळेची पी.एम.श्री. योजनेअंतर्गत निवड झाली असून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत शाळेस जुन्नर तालुका द्वितीय क्रमांकाचे दोन लक्ष रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.कला गुण विकासासाठी घेतलेल्या कलाविष्कार सांस्कृतिक कार्यक्रमातून शाळेस मिळालेल्या एक लक्ष रुपये देणगीतून संगणक लॅब उभारून विद्यार्थ्यांसाठी संगणक शिक्षणाची सोय उपलब्ध केली आहे.
रोटरी क्लब नारायणगाव हायवे तर्फे शाळेस दूरदर्शन संच व ई लर्निंग संच उपलब्ध करून देण्यातआला.जीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे विद्यार्थ्यांची नाक,कान,घसा व दंत चिकित्सा करण्यात आली.पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी झाली.प्राथमिक आरोग्य केंद्र वारूळवाडी व येडगाव तर्फे विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी करण्यात आली.मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिर्के यांनी प्रास्ताविक केले तर सहशिक्षिका कांचन इंदोरे यांनी आभार मानले.
COMMENTS