बोतार्डे | जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोतार्डे येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस रस्त्याच्या मध्यभागीच बंद पडल्याने प्...
बोतार्डे | जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोतार्डे येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस रस्त्याच्या मध्यभागीच बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
जुन्नर ते इंगळून एम एच. ४० एन. ९२८४ या क्रमांकाची एसटी बस होती हि बस इंगळून वरून जुन्नरला येत असताना बोतार्डे येथील चढावर येऊन रस्त्याच्या मध्यभागीच अचानक गियर अडकल्याने बंद पडली.
वास्तविक पश्चिम भागात एसटी बसेस संख्या दुर्मिळ असल्यामुळे प्रवासाची मोठया प्रमाणात गैरसोय होत असते, जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील भिवाडे, इंगळून, सोनवळे, शिंदे, घंगळदरे, राळेगन, बोतार्डे येथील विद्यार्थी व प्रवासी हे मोठया प्रमाणात प्रवास करत असतात, मात्र विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत असते, सध्या रस्ते वाहतूक सुरक्षितता अभियान सुरू आहे मात्र नारायणगाव आगाराच्या बस या अतिशय धोकादायक प्रकारच्या झालेल्या असून प्रवासी व वाहन चालक व वाहक यांनादेखील प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतं असतो.
नारायणगाव डेपोच्या जवळपास ६० बस या सध्या वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत असे वाहक व चालक यांनी सांगितले म्हणजेच वरील भागात प्रवाशांच्या संख्येची क्षमता पाहता हि संख्या नगण्य आहे.
या गोष्टीकडे परिवहन महामंडळाने वेळीच लक्ष देऊन यावर उपाययोजना करून चांगल्या एसटी बसेस पाठवाव्यात अशी मागणी प्रवासी करत आहेत.
COMMENTS