सातारा : सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्यातील एक दुष्काळी गाव म्हणून ज्याची ओळख होती तेच निढळ गाव ज्या गावात शिक्षण घेऊन तरुण हा बाहेर शह...
सातारा : सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्यातील एक दुष्काळी गाव म्हणून ज्याची ओळख होती तेच निढळ गाव ज्या गावात शिक्षण घेऊन तरुण हा बाहेर शहरांत नोकरी करायचे.
या गावात सलग दहा वर्षे दुष्काळ पडलेला होता. त्यानंतर एकत्रित येऊन लोकसहभागाच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे या उद्देशातून १९८३ ते १९९५ गावच्या विकासाच्या उद्दिष्टनुसार चंद्रकांत दळवी यांच्या पुढाकारातून सुरुवातीला गावात शाळेची इमारत बांधली प्रत्येक घरातून १०० रूपये देणगी काढून सलग तीन वर्ष देणगीचे सातत्य ठेऊन शाळा बांधून गावातील मुलांना गावातच शिक्षण देण्याचे मौलिक कार्य केले. वाड्या वस्त्यामध्ये डांबरीकरण रस्ते, वीज, पाणी, भौतिक गरजा या पूर्ण केल्या. या गावची लोकसंख्या ५००० एवढी असून गावात विविध जातीधर्माचे लोकं एकत्रित राहतात, गावात वनिकरण करून त्यानंतर आजमितीला मोठया प्रमाणात पाऊस पडत असतो. गाडगे बाबा ग्रामस्वछता अभियान ९५ साली राबविले, २२ वर्ष झाले तंटामुक्ती पंचकमिटी गावातील भांडणे गावातच सोडविणे या सर्व योजना राबविण्यात आल्या, यासाठी शासनाने २५ लाख रूपये बक्षीस दिले असं हे निढळ पाणीदार गाव आहे.
COMMENTS