मुंबई : प्रसिद्ध साहित्यिक आणि "आम्ही मुंबईकर" या साप्ताहिकाचे संपादक श्री. प्रमोद सूर्यवंशी यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्...
मुंबई : प्रसिद्ध साहित्यिक आणि "आम्ही मुंबईकर" या साप्ताहिकाचे संपादक श्री. प्रमोद सूर्यवंशी यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. स्वर्गीय यमुनाबाई बाजी राणे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित २६व्या मालवणी महोत्सवात हा सन्मान करण्यात आला.
प्रमोद सूर्यवंशी हे एक नावीन्यपूर्ण विचारांचे साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी केवळ संपादकीय लेखनच नाही, तर समाजाला प्रगल्भ संदेश देणारे अनेक लघुपटही साकारले आहेत. त्यांच्या लघुचित्रपटांनी समाजातील समस्यांना प्रकाशझोताखाली आणत कलात्मकतेचे आणि सामाजिक जाणिवेचे उत्तम उदाहरण दिले आहे.
त्यांना सन्मान प्रदान करताना , "प्रमोद सूर्यवंशी हे केवळ साहित्यिक नाहीत, तर समाजासाठी योगदान देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी केलेले लेखन आणि निर्मिती हे समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे आहे." असे गौरवोद्गार उपस्थित प्रमुख अतिथीनी काढले.
प्रमोद सूर्यवंशी यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या महोत्सवात मान्यवर साहित्यिक, कलाकार, आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना त्यांच्या लेखन आणि निर्मितीने साहित्य क्षेत्राला नवे वळण मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
"आम्ही मुंबईकर" या साप्ताहिकाच्या संपादनाबरोबरच, सामाजिक जाणीवा अधोरेखित करणाऱ्या त्यांच्या लघुपटांना स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. साहित्य, कला आणि समाजसेवा या तीनही क्षेत्रात त्यांनी आजवर बजावलेली भूमिका ही अनुकरणीय आहे.
प्रमोद सूर्यवंशी यांचे हे कौतुक मुंबईकरांसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.
COMMENTS