लाडकी बहीण योजनेंतर्गत 1500 रुपये जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत. पहिले दोन हप्ते एकत्र त्यानंतर उर्वरित दोन हप्ते एकत्र...
लाडकी बहीण योजनेंतर्गत 1500 रुपये जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यावर जमा होत आहेत. पहिले दोन हप्ते एकत्र त्यानंतर उर्वरित दोन हप्ते एकत्र खात्यावर जमा झाले होते. त्यानंतर आता डिसेंबरपर्यंत सहा हप्ते महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
ज्या महिलांना अजूनही योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांचे अर्ज बाद झाले असावेत अथवा त्यांच्या कागदपत्रात काहीतरी गडबड असावी त्यामुळे तुम्ही तातडीने हे शोधून काढा. नाहीतर तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केशरी आणि पिवळे रेशन कार्ड वगळता सर्वच अर्जांची पडताळणी होणार आहे. शिवाय वर्धा, पालघर, लातूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातून अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
अर्ज बाद होण्याचे निकष
कुटुंबाचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न
घरात कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन
शासकीय नोकरी अलकाना घेतलेला योजनांचा लाभ
एका सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तर त्यांना लाभ मिळणार नाही
ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करुन दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या त्यांना लाभ मिळणार नाही
ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले त्यांचे अर्ज बाद केले जाणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. अखेर या चर्चांना अदिती तटकरे यांनी पूर्णविराम दिला. गुरुवारी झालेल्या नव्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीनंतरच फेरपडताळणी होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
अदिती तटकरे काय म्हणाल्या?
आयकर आणि परिवहन विभागाकडून आम्ही माहिती मागवली आहे. ज्यांच्या उत्पन्नत वाढ झाली आहे अथवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा सर्व महिलांचे अर्ज बाद केले जातील. ज्या महिलांना नोकरी आहे आणि त्यांचं उत्पन्न निकषांमध्ये बसत नाही त्यांचे अर्ज बाद होतील. फेरतपासणीसाठी आयकर विभागाकडून डेटा मागवला आहे. राज्यात फेरतपासणी सुरू झाली आहे. याआधी पुणे, लातूरसह अनेक जिल्ह्यांतील अर्ज बाद झाले होते.
मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत
एकूण पाच निकषांच्या आधारे अर्ज बाद करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ज्या महिलांनी फसवणूक केली आहे त्यांना पैसे परत द्यावे लागतील अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक निकालानंतर स्पष्ट केलं होतं.
COMMENTS