प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट ( सर ) निघोटवाडी दि.२३ जानेवारी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनि...
प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट ( सर )
निघोटवाडी दि.२३ जानेवारी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जि.प.शाळेत खाऊवाटप व निघोटवाडी फाटा तालुका आंबेगाव येथे स्वाभिमानी मराठा महासंघ व शिवसैनिकांच्या वतीने प्रतिमापुजन व अभिवादन करण्यात आले. गेली तीस वर्ष शिवसेनेशी बांधिलकी ठेऊन शिवसेनेसाठी विविध कार्यक्रम, उपक्रम राबवून दर पैसा व वेळ खर्च करुन शिवसेना घरोघरी गावोगावी पोहोचवणारे भारतीय विदयार्थी सेना माजी तालुकाप्रमुख प्रा.अनिल निघोट व स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा.सुरेखाताई निघोट यांच्यावतीने निघोटवाडी प्राथमिक शाळेत खाऊवाटप प्रतिमापुजन व निघोटवाडी फाटा येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा.अनिल निघोट यांनी आझाद हिंद सेना संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा चा नारा देत फौज ऊभारून ईंग्रजांना सळो की पळो केले तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सामान्य मराठी माणसांचा स्वाभिमान जागा करून ,सामान्य शिवसैनिकांस आमदार, खासदार मंत्री मुख्यमंत्री केले,पदाधिकारी केले ,ते बाळासाहेबांना विसरले , पण सामान्य शिवसैनिक मात्र बाळासाहेबांच्या विचारावर ठाम आहेत. तर स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा.सुरेखाताई निघोट यांनी बाळासाहेबांनी मराठी माणसांची भक्कम एकजुटीची शिवसेना व समाजासाठी धावुन येणारे शिवसैनिक घडवले. पैशासाठी लाचारी करण यावेळी निघोटवाडीच्या माजी सरपंच निशा निघोट, रावजीशेठ निघोट, मयुर निघोट, संपत कायगुडे साहेब, कैलास निघोट, गणेश निघोट, संजय चिंचपुरे, अशोक निघोट , संगिता निघोट, आकांक्षा निघोट मुख्याध्यापक कांचन शिंदे,शिक्षक अनिल लोंढे, विकास बाणखेले, भाग्यश्री राजपूत, मिनल नवगिरे,विद्यार्थी व निघोटवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS