जुन्नर, दि. ५ : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे ५ वे जुन्नर तालुका अधिवेशन कॉम्रेड प्रभाकर संझगिरी स्मृती भवन, जुन्नर येथे मोठ्या उ...
जुन्नर, दि. ५ : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे ५ वे जुन्नर तालुका अधिवेशन कॉम्रेड प्रभाकर संझगिरी स्मृती भवन, जुन्नर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
माकपचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड नाथा शिंगाडे यांच्या हस्ते पक्षाचा झंडा फडकवून अधिवेशनाची सुरुवात झाली. त्यानंतर उद्घाटन कॉ. नाथा शिंगाडे यांनी केले तर सत्राच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथ निगळे हे होते.
त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये ज्ञानेश्वर सावळे, संजय साबळे व मुकुंद घोडे यांनी अध्यक्षीय मंडळाचे काम पाहिले. या सत्रामध्ये तालुका सचिव कॉम्रेड गणपत घोडे यांनी तीन वर्षाच्या अहवालाची मांडणी केली, त्यावर अहवालावरील चर्चेमध्ये सभासदांनी सहभाग नोंदवला. तालुका समितीचा अहवाल अधिवेशनाने एकमताने मंजूर केला. अधिवेशनात एकूण चार ठराव पारित करण्यात आले.
ठराव
1. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळवण्यासाठी चा लढा तीव्र करा.
2. महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधी व हक्कांसाठीचा लढा तीव्र करा.
3. बेरोजगारी विरुद्धचा लढा तीव्र करा.
4. धर्मांधता, जातीयवाद व अस्मिता वाद विरोधी लढा तीव्र करा.
या अधिवेशनाने 11 जणांची तालुका समिती एकमताने निवडली. तर 1 कायम निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आले. तर विद्यमान तालुका सचिव कॉम्रेड गणपत घोडे यांची फेरनिवड करण्यात आली.
नवनिर्वाचित जुन्नर तालुका कमिटी :
1. गणपत घोडे
2. लक्ष्मण जोशी
3. सोमनाथ निर्मळ
4. संजय साबळे
5. ज्ञानेश्वर सावळे
6. विलास साबळे
7. नवनाथ मोरे
8. नारायण वायाळ
9. मुकुंद घोडे
10. कोंडीभाऊ बांबळे
11. महिलांसाठी राखीव
12. किरण हिले (निमंत्रित सदस्य)
अधिवेशनाच्या समारोप सत्रात माकपचे जिल्हा कमिटी सदस्य कॉम्रेड ज्ञानेश्वर मोटे म्हणाले, नवीन जुन्नर तालुका समितीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन! मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकिमध्ये केलेल्या कामगिरीचा उल्लेख करत पक्षाचे गावागावा मध्ये असलेल्या कामाच्या जोरावर आपण येणारी निवडणूक लढवणार आहोत याचे संकेत दिले व कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच त्यासाठी कामाला लागावे असे सांगितले.
तर ज्येष्ठ नेते कॉम्रेड नाथा शिंगाडे म्हणाले, पक्षाचे काम विस्तारलेले आहे. लोकांमध्ये जाऊन संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जनतेचे अनेक प्रश्न, समस्या आपण सोडविल्या आहेत. पक्ष वाढीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी आपले योगदान दिलेले आहे, त्याच्याप्रमाणे आपणदेखील पुढे चांगल्या प्रकारे कार्य करा. काही महिन्यांत पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकी लागतील. आपला पक्ष याही निवडणुकीत तितक्आयाच ताकतीने उमेदवार उभे करेल. त्यासाठी आतापासूनच कामाला लागूयात व आपले उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार या अधिवेशनाच्या निमित्ताने करूयात, असा विश्वास व्यक्त करत, नवीन कमिटीला शुभेच्छा दिल्या.
यानंतर सोमनाथ निर्मळ, विश्वनाथ निगळे व मोहन पोटे यांनी नवीन कमिटीला शुभेच्छा दिल्या.
यानंतर नवनियुक्त सचिव कॉ. गणपत घोडे म्हणाले, "पक्षाच्या या पाचव्या अधिवेशनात जे काही ठराव मांडण्यात आले आहेत. त्यावरती नवीन तालुका समिती पुढील तीन वर्ष काम करेल. तसेच तालुका समितीबरोबरच सर्व पक्ष सभासदांनी आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी पक्षाचे काम करावे. शोषित, वंचित, कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर घटकांचे प्रश्न घेऊन लढ्यासाठी माकप कटीबद्ध असल्याचेही घोडे म्हणाले.
आपला,
गणपत घोडे, सचिव
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
जुन्नर तालुका समिती
COMMENTS