पुणे शहरातील मगरपट्टा परिसरात एका युवकाने भररस्त्यात पोलिसाला मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. ११) सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली आ...
पुणे शहरातील मगरपट्टा परिसरात एका युवकाने भररस्त्यात पोलिसाला मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. ११) सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. स्थानिकांनी या युवकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसाला मारहाण करणारा युवक हा नशेत होता. संबंधित युवक मगरपट्टा भागात एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता. तसेच रस्त्यावरुन जात असलेल्या अनेकांना तो दगड सुद्धा फेकून मारत होता. दरम्यान, या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असलेले वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला हाटकले. यावेळी त्या युवकाने थेट पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यानंतर जमावाने युवकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
हडपसर वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी श्री. पवार हे सायंकाळी मंगरपट्टा परिसरातील रासकर चौकात कर्तव्यावर होते. यावेळी विरुद्ध दिशेनं येणाऱ्या वाहनांवर ते कारवाई करत होते. त्यावेळी एक जण तिथे थांबलेल्या नागरिकांला दगडाने मारहाण दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतून पोलिसाने त्याला हटकले. याचा राग आल्याने युवकाने वाहतून पोलिसालाच मारहाण सुरू केली. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती मिळताच हडपसर वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक तसेच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी आरोपीला ताब्यात देखील घेतले आहे. आरोपी मानसिक आजारी असल्याचे सांगण्यात आले आहे.
COMMENTS