जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोतार्डे, सुराळे, राळेगण, बेलसर, खानगाव, आपटाळे, शिंदे घंगाळदरे या परिसरात निसर्गातील वातावरणा...
जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोतार्डे, सुराळे, राळेगण, बेलसर, खानगाव, आपटाळे, शिंदे घंगाळदरे या परिसरात निसर्गातील वातावरणात दिवसेंदिवस बदल होत असून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडांशी आलेला घास निसर्ग ओढून घेतो अशी परिस्थिती सध्या या भागात आहे.
खरीप हंगामातील पिकांची तर पुरती दैना होऊन गेली आहे आणि आता हिवाळ्यात देखील रब्बी पिकांवर ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसत आहे त्यामुळे वास्तविक शेतकरी पूर्णतः भयभीत झाला आहे.
रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, कांदा, गहू, मका, आंबा या पिकांच्या व फळांच्या वाढीवर या वातावरणाचा फरक जाणवत असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
आधीच्या हंगामात मजुरी व निसर्गाच्या लहरी वातावरणात शेतकरी मेटकुटीला आलेला होता त्यातूनही रब्बी हंगामात बळीराजा उभा राहून पिकांची जोपासना करत असताना मात्र निसर्ग काही केल्या साथ देत नसल्याचेच बळीराजा सांगतोय.
ढगाळ वातावरण झाल्याने पिकांवर मोठया प्रमाणात किड पडत आहे त्यामुळे शेतकरी पिकांवर महागडी औषधे फवारणी करून देखील दिवसेंदिवस ढगाळ वातावरण होत असल्यामुळे शेतकरी निराशेत जात आहे.
वास्तविक पिकांवर किड पडणे व पिकांची योग्य अशी वाढ न होणे त्यामुळे निश्चितचं पिकांच्या उत्पन्नावर या गोष्टीचा परिणाम होणार व उत्पादनात घट होईल अशी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
COMMENTS