बीड | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी वाल्मिक कराड याच्या पोलिस कोठडीची मागणी एसआयटी पथकाने केली होती. त्यानुसार, बी...
बीड | सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी वाल्मिक कराड याच्या पोलिस कोठडीची मागणी एसआयटी पथकाने केली होती. त्यानुसार, बीड सत्र न्यायलायाने मकोका गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
वाल्मिक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात जरी न्यायालयीन कोठडी मिळालेली असली तरी हत्येच्या कटात संशयित सहभागी असल्याचे कलम त्यावर लावण्यात आल्याने त्याला बीड जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर वाल्मिक कराड याला न्यायालयाने ७ दिवसांची म्हणजेच २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी कराडला न्यायालयातून पोलिस व्हॅनमध्ये नेत असताना कोर्टाबाहेर चांगलाच राडा पाहायला मिळाला. वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ अनेकांनी घोषणाबाजी केली. कोर्टाबाहेर वकिलांचेच दोन गट दिसून आले, त्यापैकी एका महिला वकिलाने वाल्मिक कराडवर आरोप करत फाशीची शिक्षा द्या म्हणत घोषणाबाजी केली. तर, एका वकिलाने वाल्मिक कराड याच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याचे म्हणत त्यांचे समर्थन केले, तसेच आंदोलनाच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचे म्हटले.
दरम्यान, आज न्यायालयाती वाल्मिक कराडच्या मकोका गु्न्ह्यासंदर्भात सुनावणी झाली. त्यामध्ये बीडमधील सरपंच संतोष देशमुखची 9 डिसेंबर रोजी हत्या झाली, त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान 10 मिनिटांच्या कालावधीत सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून एकमेकांशी संभाषण झाल्याची माहिती SIT ने कोर्टात दिली आहे. या तिघांमध्ये त्या दिवशी नेमकं काय बोलणं झालं याचा तपास करायचा आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या 10 दिवसांच्या कस्टडीची मागणी SIT तर्फे करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांच्या फोनवरील संभाषणाची वेळ मिळतीजुळती असल्याचेही एसआयटीने म्हटले आहे.
COMMENTS