नारायणगाव ता.जुन्नर येथील भागेश्वर बहुउद्देशीय सांस्कृतिक भवनात ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद ...
नारायणगाव ता.जुन्नर येथील भागेश्वर बहुउद्देशीय सांस्कृतिक भवनात ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त महिलांना "राजमाता जिजाऊ नारीशक्ती पुरस्कार 2025" देऊन सन्मानित करण्यात आले अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश गडगे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नारायणगाव शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस्.मुरादे होते.जुन्नर तालुका गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे,नारायणगाव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा.डॉ.लहू गायकवाड,साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कानडे,सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा तोडकर,प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष शरदराव शिंदे,डॉ.धीरज तोडकर आदी मान्यवर व प्रतिष्ठानचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कारार्थी महिलांना सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, साईबाबांची प्रतिमा,शाल व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.बी.एस्.मुरादे, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, प्रा.डॉ.लहू गायकवाड,पुरस्कारार्थी आशा पाटील व अलका मेहेर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्ष निवड मंगेश मेहेर यांनी केले.प्रास्ताविकात प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा त्यांनी सादर केला.या कार्यक्रमासाठी रवींद्र वाजगे,मंगेश मेहेर,रमाकांत कवडे,सचिन मुळे,अंबादास वामन,भानुदास बटवाल व प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रम प्रसंगी शैलजा तोडकर,मंदाकिनी शिंदे,आशा पाटील,स्वाती मुळे,वनिता गडगे,भारती कनिंगध्वज,रेश्मा पवार,अनु शिर्के,मंगल भालेराव,निर्मला मेहेर,हेमलता राजगुरू,जयश्री नाईक,सुचिता शिंगोटे,ज्योती थोरात,दिपाली नागरे,पूनम हांडे,नलिनी बटवाल,रोहिणी बाळसराफ,राजश्री डोंगरे,अलका मेहेर,पल्लवी ढवळे,मनिषा डोंगरे,जयश्री गडगे,उर्मिला औटी, मनिषा कानडे,सुरेखा कानडे, सुलभा भोसले,लतिका कवडे, रूपाली कवडे,स्वाती शिंदे,सुरेखा बटवाल,जयश्री पवार,मनिषा वामन,चैताली सरोदे,संगिता वाव्हळ,अंजली सोमवंशी,राजश्री वायकर,उर्मिला वाजगे,स्मिता मुंढे,भारती इंगळे,माया खिलारी,परवीन मोमीन,लिलावती सानप,ज्योती हाडवळे या महिलांना "राजमाता जिजाऊ नारीशक्ती पुरस्कार 2025" देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे सचिव साईनाथ कनिंगध्वज व खजिनदार विजय नागरे यांनी केले तर आभार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी मानले.
COMMENTS