पुणे येथे दि.5 डिसेंबर 2024 ( प्रा. सतिश शिंदे ) पुण्यातील पत्रकार भवनात चेंज इंडिया फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सचिन धनकुडे यांचे वतीने पु...
पुणे येथे दि.5 डिसेंबर 2024 ( प्रा. सतिश शिंदे )
पुण्यातील पत्रकार भवनात चेंज इंडिया फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सचिन धनकुडे यांचे वतीने पुणे जिल्हयात२०२४ विधानसभा निवडणुक लढलेल्या सर्व अपक्ष, पराभूत लढवय्या ऊमेदवारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व उमेदवार यांनी पुरस्कार स्वीकारताना आम्ही स्वाभिमानासाठी धनदांडग्या , राजकीय पुढारींविरोधात निवडणूक लढलो निवडणूक यंत्रणेत अनेक दोष ,प्रतिकुल परिस्थितीतही निवडणूक बिनविरोध होऊ न देता लढलो असे बोलले तसेच आपल्या अफाट पैशानं मतदार विकत घेणाऱ्या ,मतदारांना गृहित धरून साम दाम दंड भेद इ. चा वापर इतरांविरुद्ध करून लोकशाही धोक्यात अणणाऱ्या विरोधात लढलो,यात आपलं कोण परकं कोण हे तर कळलं पण पैशांवरच निवडणूका लढल्या जातात समाजासाठी केलेलं काम शुन्य,अश्या भावना व्यक्त केल्या...कोणत्याही पक्षाला कट्टर निष्ठावंत कार्यकर्त्यांची किंमत राहिली नाही, आता पैसे मिळाले तरच बाहेर पडणारे ,राजकारण हाच पैसे कमवण्याचा धंदा समजणारे कार्यकर्ते प्रचंड संख्येने वाढले असुन त्यांनाच सध्या मानसन्मान वाढत आहे. त्यात पोस्टल मतात पुढे असणारे आमच्या मतांची संख्येवर सुद्धा आमचाच विश्वास बसत नाही.
त्याचप्रमाणे या निकालावर महाराष्ट्रातील जनतेचा पण विश्वास बसत नाही,.मतदान केलं एकाला विजयी भलताच कसा यावर मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्याचा प्रयत्न प्रशासनाने दडपला.सत्ताधिशांविरुद्ध काहीच चालणार नाही, आहे ते स्विकारुन गप्प बसा अशी अरेरावी केली तरी जनमानसात फार मोठी अस्वस्थता आहे, याचं ऊत्तर कधी मिळणार असा सुर यावेळी ऐकायला मिळाला.
शेवटी सर्वच लढवय्या ऊमेदवारांनी संघटित राहुन प्रशिक्षण घ्यावं असं मत रमेश हांडे यांनी तर फिरोज मुल्ला यांनी मिळालेल्या मतांवर अविश्वास व्यक्त केला. यावेळी अनेक ऊमेदवारांनी आपली मते मांडली, यात राजेंद्र ढोमसे ढोमसे,किसन गोपाळे,सुनिल ईंदोरे,रविंद्र रंधवे अशा अनेक ऊमेदवारांनी विचार मांडले.कार्यक्रम आयोजक सचिन धनकुडे यांनी आपण समोरच्या धनाढ्य ऊमेदवारांविरोधात लढलात,विकले गेला नाहीत. यापुढे चिन्ह हटवुन फक्त ऊमेदवाराचा फोटो नाव हवे अशी मागणी करुन पाच वर्षातून एकदा येणारे.. फसवे ढोंगी राजकारण्यांविरोधात केलेल्या संघर्षास सलाम करुन सर्वांचा सत्कार केला.अध्यक्षस्थानी के डी पवार तर निवेदन बाळकृष्ण नेहरकर तर आभार डॉ.वांग्वाड यांनी मानले.
COMMENTS