आधार कार्डप्रमाणाचे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचा "युनिक फार्मर आयडी" तयार केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या "ॲग्रीस्टॅक...
आधार कार्डप्रमाणाचे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांचा "युनिक फार्मर आयडी" तयार केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या "ॲग्रीस्टॅक" योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या यूनिक फार्मर आयडी आणि त्यांच्या लँड रेकॉर्डला जोडण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या आयडीमुळं शेतऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शेतकरी आधार कार्ड नोंदणीसाठी लवकरच गावागावात खास मोहिम सुरु होणार आहे. याच आधार आयडीद्वारे शेतकऱ्यांना सर्वा शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. "ॲग्रीस्टॅक" योजनेअंतर्गत तयार होणारा युनिक शेतकरी आधार भविष्यात कोणकोणत्या कामात उपयोगी येणार हे आज आपण जाणून घेऊयात.
"युनिक फार्मर आयडी", काय आहे विशेष ?
पीएम किसान योजनेचं अनुदान, किसान क्रेडिट कार्ड, पिक विमा आणि परतावा यासाठी शेतकरी आधार आवश्यक आहे.
पिकांची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी, शेती-पीक सर्वेक्षण तसेच शेतमालाच्या शासकीय केंद्रावरील विक्रिसाठी शेतकरी आधार आवश्यक
कृषी विभागाच्या विविध योजनाअंर्गत कृषी निविष्ठा आणि इतर सेवेंचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक आहे.
COMMENTS