प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) पुणे जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) व समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
पुणे जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) व समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय विज्ञान मेळावा व प्रदर्शन २०२४-२५ शिक्षक सहविचार सभा समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकतीच घेण्यात आली.
यावेळी गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे,संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा.प्रवीण ताजने,सचिव प्रकाश जोंधळे सर,कार्यकारिणी सदस्य,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ताबाजी वागदरे,सचिव अशोक काकडे,सर्व विभागाचे केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक,विज्ञान व गणित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
उपस्थित मुख्याध्यापक,शिक्षकांना मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे म्हणाल्या की,या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला,अंगभूत कौशल्यांना वाव मिळतो म्हणून यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी कसे सहभागी होतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.तसेच वाचन,लेखन,गणिती क्रिया व स्पर्धात्मक परीक्षा यासाठी आजचा विद्यार्थी सक्षम व्हावा हा यामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नवनिर्मितीची संधी याच वयात विद्यार्थ्यांनी आत्मसात करून प्रगती साधावी.या प्रदर्शनाला मेळाव्याचे स्वरूप देऊन प्रगत तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी.छोट्या छोट्या प्रतिकृतीतून आनंद घेऊन एक वातावरण निर्मिती होण्यासाठी हे विज्ञान प्रदर्शन महत्वाचे आहे.
विज्ञान प्रदर्शन हे केवळ प्रदर्शन न राहता तो एक विज्ञान मेळावा व्हावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत.
प्रदर्शनामधील सहभागी संस्था:-
नेहरु विज्ञान केंद्र,मुंबई-फिरते विज्ञान (Mobile Science exhibition) प्रदर्शन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभाग-मोबाईल सायन्स लॅब
आयुकामार्फत-अवकाश दर्शन व विज्ञान खेळणी मांडणी
दुर्मिळ शस्त्रास्त्रे व नाणी प्रदर्शन
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये:-
प्रकल्प स्पर्धेबरोबरच
संगणकीय सादरीकरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,विज्ञान प्रश्नमंजुषा, कौन बनेगा विज्ञानपती,पोस्टर सादरीकरण स्पर्धा.
नाविन्यपूर्ण उपक्रम:-
चला प्रयोग करूया-यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रयोग करायचे आहेत.प्रश्नोत्तरे विचारून त्यानंतर बक्षिसे देण्यात येतील.
आयडिया बॉक्स कॉम्पिटिशन:-
यामध्ये विज्ञान प्रेमी शिक्षक,विद्यार्थी,पालक व नागरिक यापैकी कुणीही सहभागी होऊ शकतो.विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी त्यांना सुचणाऱ्या आयडिया प्रदर्शनाच्या ठिकाणी तयार केलेल्या आयडिया बॉक्समध्ये टाकायच्या आहेत.उत्तम आणि सर्वोत्कृष्ट तीन आयडियांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
नामवंत शास्त्रज्ञ,संशोधक,वक्ते यांची व्याख्याने,गणिती व विज्ञान खेळण्याचे स्वतंत्र दालन,अंधश्रद्धा निर्मूलनपर जादूचे प्रयोग,विद्यार्थी उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन आदी उपक्रमाचा तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधन वृत्ती जोपासण्यासाठी वेगवेगळ्या विज्ञानपूरक उपक्रमांचा या प्रदर्शनात समावेश केला जाणार असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.
या मेळाव्यात आपत्ती व्यवस्थापन कक्ष तयार करणार असून त्याद्वारे मार्गदर्शन देण्यात येईल.व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभागाबाबतचे प्रमाणपत्र देणार असल्याचे प्रा.प्रवीण ताजणे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी तर आभार प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी मानले.
COMMENTS