कल्याण : एक महिला घरातील अडचणी सोडवण्याकरता भोंदू बाबाकडे गेली असताना भोंदू बाबाने अघोरी विद्येच्या नावाखाली महिलेसोबत अश्लिल चाळे केल्याच...
कल्याण : एक महिला घरातील अडचणी सोडवण्याकरता भोंदू बाबाकडे गेली असताना भोंदू बाबाने अघोरी विद्येच्या नावाखाली महिलेसोबत अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण जवळील आंबिवली मोहने परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अरविंद जाधव (वय 50) असे भोंदू बाबाचे नाव आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित महिला भोंदू बाबाकडे घरातील अडचणी घेऊन नातेवाईकासह गेली होती. तू खूप टेन्शनमध्ये दिसत आहेस, काहीही टेन्शन घेऊ नकोस, तुझी सगळी टेन्शन मी दूर करतो, असे त्याने महिलेला सांगितले. त्यानंतर भोंदू बाबाने महिलेसोबत आलेल्या नातेवाईकांना बाहेर थांबायला सांगितले. यानंतर बाबाने महिलेसोबत अश्लिल चाळे करायला सुरूवात केली. यानंतर महिलेने विरोध केला असता, कुटुंबाचं बरं वाईट केलं जाईल, अशी धमकी दिली, अशी तक्रार महिलेने केली आहे.
दरम्यान, पीडित महिलेने याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून अरविंद जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच तिच्यासह अन्य कोणत्या महिले अथवा मुली बाबत असा कोणता प्रकार घडला आहे का? याचा तपास चालू आहे.
COMMENTS