प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) आज सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सावरगाव, ता. जुन्नर, जि. पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राम...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
आज सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सावरगाव, ता. जुन्नर, जि. पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे , शंकरा आय हॉस्पिटल पनवेल व ग्रामपंचायत सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बारावे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. या शिबिराला परिसरातून नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ८७ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व २५ नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले. मागील एक वर्षात डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील तीन हजार पेक्षा जास्त लोकांना नवी दृष्टी मिळाली असून सर्व शस्त्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी झाल्या आहेत.
या शिबिरात रुग्णांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, प्रवास, निवास, जेवण, चष्मा व एक महिन्याची औषधे या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. तसेच या शिबिरामध्ये तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणारा असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले.
याप्रसंगी डिसेंट फाऊंडेशनचे सचिव डॉ.एफ.बी.आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, डॉ.श्रुती व त्यांची सर्व टीम ,सरपंच दीपक बाळसारफ, उमेश जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिकेत पाखरे, दिलीप कचेरे , अशोक बाळसराफ, डिसेंट फाऊंडेशनचे समन्वयक योगेश वाघचौरे ,परिचारिका, आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डिसेंट फाउंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि आरोग्य विषयक काम करणारी जुन्नर तालुक्यातील एक अग्रगण्य संस्था असून, संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, किशोरवयीन मुली, महिला, शेतकरी, दिव्यांग व्यक्ती व जेष्ठ नागरिक अशा विविध स्तरातील गरीब आणि गरजू लोकांसाठी काम केले जाते.
जुन्नर तालुक्यात नेत्र शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या सहकार्याने तीन हजार पेक्षा जास्त नेत्र रुग्णां च्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून, त्यांना नवी दृष्टी दिली आहे.
COMMENTS