प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे अंतर्गत जयहिंद इंटरनॅशनल स्कूल कुरण येथे झालेल्...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे अंतर्गत जयहिंद इंटरनॅशनल स्कूल कुरण येथे झालेल्या तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत समर्थ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल व समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे बांगरवाडी येथील ११ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाल्याची माहिती समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे व समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
१४ वर्षे वयोगट (मुली)-
२५ किलो वजनी गट
प्रथम क्रमांक-गौरी चौधरी
४० किलो वजनी गट
प्रथम क्रमांक-रुद्रा आहेर
१४ वर्षे वयोगट (मुले)
२७ किलो वजनी गट
प्रथम क्रमांक-उत्कर्ष बेलकर
३४ किलो वजनी गट
प्रथम क्रमांक-कार्तिक पुंडे
३७ किलो वजनी गट
प्रथम क्रमांक-प्रणव गाजरे
४७ किलो वजनी गट
प्रथम क्रमांक-संस्कार शिंदे
१७ वर्षे वयोगट (मुली)
४५ किलो वजनी गट
प्रथम क्रमांक-श्वेता मटाले
५१ किलो वजनी गट
प्रथम क्रमांक -श्रद्धा दिघे
६२ किलो वजनी गट
प्रथम क्रमांक-दीक्षा गाडगे
१७ वर्षे वयोगट (मुले)
५३ किलो वजन गट
प्रथम क्रमांक-संस्कार भांबरे
१९ वर्षे वयोगट (मुली)
४५ किलो वजनी गट
प्रथम क्रमांक-अनुष्का जाधव
सदर खेळाडूंपैकी गौरी चौधरी, दीक्षा गाडगे,श्रद्धा दिघे व अनुष्का जाधव या चारही खेळाडूंनी जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळविल्याची माहिती क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी दिली.
या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,सुरेश काकडे,कराटे प्रशिक्षक महेंद्र गुळवे व मोनिका चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच समर्थ शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
COMMENTS