लोकसभा निवडणुकीत जागावाटप करताना महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या लहान घटक पक्षांना जागा देण्यात आली नव्हती. त्यामुळे आता आगामी काळात होत...
लोकसभा निवडणुकीत जागावाटप करताना महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या लहान घटक पक्षांना जागा देण्यात आली नव्हती. त्यामुळे आता आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच लहान घटक पक्ष खडबडून जागे झाले आहेत.
त्यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षाकडे जागांची मागणी केली आहे.
महाविकास आघाडीच्या (MVA) जागावाटपावरून चर्चा सुरु आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 11 जागा तर समाजवादी पक्षाने 12 जागेंची मागणी केली आहे. त्याचबरोबर लहान मोठे पक्ष संघटनेने जवळपास एकूण 40 च्या आसपास जागांची मागणी आघाडीकडे केली आहे.
जागावाटपासाठी आघाडीची बैठक 8 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे या बैठकीत लहान पक्षांच्या मागणीकडे कशापद्धतीने लक्ष घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.
यावेळी डावे पक्ष, समाजवादी पक्षाने (SP) जागांची मागणी केली आहे. या मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 11 जागा तर समाजवादी पक्षाने 12 जागा मागितल्या आहेत. त्याचबरोबर लहान मोठे पक्ष संघटनेनी मिळून सुमारे 40 च्या आसपास जागांची मागणी केली आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लहान घटक पक्षाला जागा देण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे आता या लहान घटक पक्षाने जागा मागितल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात आता जागावाटपात महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या वाट्याला किती जागा मिळणार? याची उत्सुकता लागले आहे.
COMMENTS