युनेस्को कडे प्रस्तावित जागतिक वारसा नामांकनासाठी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी,लोहगड आणि राजगड या तीन किल्ल्याची निवड करण्यात आली आहे, या किल्ल्...
युनेस्को कडे प्रस्तावित जागतिक वारसा नामांकनासाठी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी,लोहगड आणि राजगड या तीन किल्ल्याची निवड करण्यात आली आहे, या किल्ल्याच्या प्रचार,प्रसार आणि जनजागृती करीता जिल्हा नियोजन समिति जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने जिल्हा व तालुका स्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या तालुकास्तरीय किल्ले बनवा स्पर्धाचा निकल नुकताच जाहीर करण्यात आला असून या स्पर्धा मध्ये समर्थ गुरुकुल बेल्हे या शाळेने प्रथम क्रमांक मिळविला असल्याची माहिती तालुका समिति अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव श्री. गोविंद शिंदे आणि सचिव तथा गट शिक्षण अधिकारी श्रीम.अनिता शिंदे यांनी दिली. या स्पर्धेमध्ये जुन्नर तालुक्यातील एकूण 34 शाळा सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक स्पर्धकाणे 3 मिनिट कालावधीचे सादरीकरण करावयाचे होते.या स्पर्धेत समर्थ गुरुकुल बांगरवाडी बेल्हे यांनी प्रथम क्रमांकाचे 100000 रुपये, जि प शाळा वडगाव आनंद द्वितीय क्रमांकचे 50000 रुपये तर जि प शाळा इनामवाडी कुसुर यांना तृतीय क्रमांक चे 25000 चे बक्षीस जाहीर झाले आहे, त्याच बरोबर शिवंजली विद्या निकेतन चाळकवाडी यांनी चतुर्थ तर महालक्ष्मी विद्यालय उंबऱ्ज यांनी पाचवा क्रमांक मिळवला आहे. या पांच गावांना ग्राम विकास करिता प्रत्येकी 50 लक्ष रुपये इतके अनुदान जिल्हा नियोजन समिति मार्फत देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत ही बक्षीस जिंकण्याची संधी आहे. या स्पर्धेचे परीक्षण करीता मा. डॉ. सुनील शेळके तहसीलदार , मा. सचिन सूर्यवंशी गट विकास अधिकारी, मा. रवींद्र चौधर उपविभागीय पोलिस अधिकारी, श्री. संदीप भोळे मुख्याधिकारी नगर परिषद जुन्नर,श्री.सचिन मुंढे नायब तहसीलदार यांनी कामकाज पाहिले.श्री.यश मस्करे यांनी स्पर्धा समन्वयक म्हणून कामकाज पाहिले.
COMMENTS