प्रतिनिधी : प्रविण ताजणे ( सर ) समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे आणि ...
प्रतिनिधी : प्रविण ताजणे ( सर )
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ लोणेरे यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विभागीय आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक्स व बास्केटबॉल स्पर्धा २०२४-२५ नुकतीच समर्थ क्रीडा संकुलामध्ये संपन्न झाल्या.
किरण अकॅडमी चे मॅनेजर नवम तिवसकर व दार अल हॅण्डशा कन्सलटन्ट इंडिया प्रा.लिमिटेड पुणे चे डिजिटल प्रॅक्टिस मॅनेजर योगेश मुंडे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,बीसीएस चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये समर्थ फार्मसी च्या २१ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवल्याची माहिती प्राचार्य डॉ.बसवराज हतपक्की व डॉ.संतोष घुले यांनी दिली.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
बास्केटबॉल स्पर्धेत समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधील कल्याणी घोगरे तर समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी मधील प्रताप कुलट व अभिषेक माशेरे यांची आंतर विभागीय पुणे संघामध्ये निवड झाली.
मैदानी स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधील आदिती शेळके हिने १०० व २०० मीटर धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.तेजस सातपुते यांनी ८०० मीटर धावणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
तसेच पायल वारे हीने ८०० मीटर धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.
समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी मधील सानिका साळुंखे हिने ८०० मीटर धावणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.
१५०० मीटर धावणे या स्पर्धेत वैष्णवी लंघे हिने प्रथम क्रमांक मिळवला तर आदिती शेळके हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
४ x १०० रिले स्पर्धेत समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधील सिद्धेश शेळके,गौरव काळे,सोमनाथ नरसाळे,महेश केदारी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
४ x ४०० रिले या स्पर्धेत समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी मधील वरद वनारसे,सौरभ नागरे,गणेश देशमुख,मुस्तफा चौगुले यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
उंच उडी(मुले) या स्पर्धेत समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधील शरद नऱ्हे याने द्वितीय क्रमांक पटकावला तर कल्याणी घोगरे हिने उंच उडी( मुली) या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.
तिहेरी उडी-मुले या स्पर्धेत शरद नऱ्हे याने द्वितीय क्रमांक पटकावला.
थाळीफेक या स्पर्धेमध्ये निखिल कुऱ्हाडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
थाळीफेक मध्ये अवंतिका गवांदे हिने तृतीय क्रमांक पटकावला.
गोळाफेक-मुले या स्पर्धेमध्ये अविष्कार खेडकर याने तृतीय क्रमांक पटकावला.सीमा घोडे हिने गोळाफेक-मुली या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.
भालाफेक या स्पर्धेमध्ये कौशल पाटील याने प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाशिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,डॉ.सचिन भालेकर,प्रा.नितीन महाले,प्रा.अजय भागवत,सुरेश काकडे यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS