प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) जिल्हा नियोजन समिती व जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे मार्फत जागतिक वारसा नामांकन किल्ले बनवा या तालुका स्त...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
जिल्हा नियोजन समिती व जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे मार्फत जागतिक वारसा नामांकन किल्ले बनवा या तालुका स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे तालुका अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी .गोविंद शिंदे सो.तर सचिव तथा गटशिक्षण अधिकारी सौ.अनिता शिंदे मॅडम यांनी काम पाहिले.त्याचे मार्गदर्शनाखाली जि.प.प्राथ. शाळा इनामवाडी येथे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद,ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या सहकार्यातून "किल्ले शिवनेरीची" भव्य अशी प्रतिकृती साकारण्यात आली होती. किल्ल्यावरील प्रत्येक महत्वपूर्ण स्थान कल्पकतेने दाखविण्यात आले होते. हया स्पर्धेमुळे किल्ले शिवनेरी प्रतिकृती मनाला मोहून टाकणारी व शिवरायांची स्मृतिंना उजाळा देणा-या परंपरेची जनजागृती,इतिहासाचा वारसा जागवणारी ठरली.
या स्पर्धेत तालुक्यातील 34 शाळांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे 3मिनिटांचे सादरीकरण प्रत्येक शाळेने केले. स्पर्धेचे परिक्षण तहसीलदार सुनिल शेळके ,.गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी ,उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर सो. नायब तहसीलदार .सचिन मुंढे सो.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदिप भोळे सो.व समन्वयक म्हणून यश मस्करे यांनी काम पाहिले.
या मूल्यामापनाध्ये जि.प.प्राथ.शाळा इनामवाडीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून यासाठी मा. गटशिक्षण अधिकारी सौ.अनिता शिंदे मॅडम,विस्तार अधिकारी मा.सौ.संचिता अभंग मॅडम व केंद्रप्रमुख श्री बाळासाहेब मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.शाळेचे मुख्याध्यापक शांताराम मोधे, पदवीधर शिक्षिका श्रीम.सुमन उतळे उपशिक्षक सौ.अनामिका मोढवे, सौ.सविता उगले व निवृत्ती दिवटे सर यांनी वरिष्ठांकडून मिळालेल्या मार्गदर्शन व सूचना अंमलात आणल्या त्याचप्रमाणे सरपंच .दत्तात्रय ताजणे,उपसरपंच रमेश काळे शा.व्य.समितीचे अध्यक्ष रामदास काळे, पालक गोविंद भालेकर, माजी विद्यार्थी शुभम भालेकर,गणेश भालेकर, रोशन भालेकर सागर पारधी,अभिषेक भालेकर,साहिल भालेकर, नितीन भालेकर,महेश भालेकर,आकांक्षा व अंकिता भालेकर,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिवाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व कुसुर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजूशेठ भगत,माजी सरपंच सदाशिव ताजणे,किल्ले शिवनेरी झांज पथकाचे अध्यक्ष अनिल मोधे यांचे सहकार्याने ही प्रतिकृती बनविण्यात आली होती.तालुकास्तरीय मूल्यमापन स्पर्धेत शाळेस तृतीय क्रमांक मिळाला असल्याचे मत मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले.
COMMENTS