प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचालित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचालित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे या महाविद्यालयांमध्ये इंडिअन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा लोकल युनिट च्या अंतर्गत राज्यस्तरीय ४ थी पोस्टर स्पर्धा नुकतीच पार पडली. "औषधनिर्माणशास्त्र विज्ञानातील उदयोन्मुख ट्रेंड" या विषयानुरुप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या या स्पर्धेत १५ महाविद्यालयातून तब्बल ३१८ विद्यार्थ्यांनी आपला उस्फुर्त सहभाग दर्शविला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती प्रतिमापूजनाने झाली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील रिसर्च आणि इनोव्हेशन सेलचे संचालक डॉ.प्रतिक मुणगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पोस्टर प्रदर्शन मूल्यमापन करताना लक्षात घेतल्या जाणाऱ्या गोष्टी त्यांचे अनुभव आणि विद्यार्थ्यांना पोस्टर प्रदर्शन कसे करावे याबद्दल त्यांनी विशेष मार्गदर्शन केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
डी फार्मसी
प्रथम क्रमांक-अनुजा जोगडे, साक्षी फुले (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे )
द्वितीय क्रमांक-सृष्टी
बाणखेले, आदिती महाडिक (विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,आळे )
तृतीय क्रमांक-शुभांगी शिंदे,ऐश्वर्या मोढवे (शिवनेरी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,खानापूर )
बी.फार्मसी विजेते:
प्रथम क्रमांक-हृतिक नळे,अजिंक्य ठाकरे (संदिप इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस,नाशिक)
द्वितीय क्रमांक-सायली छेडे,अनम मोमीन (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,बेल्हे)
साक्षी पाटील (PRES इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,लोणी)
तृतीय क्रमांक-अभिषेक कोळी,सानिका साळुंखे (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे)
किरण यादव,रुत्विक वानुरे
(विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,आळे)
एम.फार्मसी विजेता:
रुतुजा भायगुडे (काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे)
यांना देण्यात आला.
विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांच्या हस्ते रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन करण्यात आला.त्याच बरोबर समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हतपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले आदि उपस्थित होते. विभागप्रमुख डॉ.सचिन दातखिळे,प्रा.नितीन महाले,डॉ.विजय वाकळे,डॉ बिपीन गांधीं,डॉ.मंगेश होले व शिक्षक यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
डॉ.विशाल मोरे व डॉ.राहुल गोडगे यांनी पर्यवेक्षक म्हणून पदभार सांभाळला.सदर कार्यक्रमाची प्रस्ताविक प्रा.प्राची पडवळ यांनी व आभार प्रदर्शन प्रा.शुभम गडगे यांनी केले.
COMMENTS