येत्या आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुका तोंडावर आल्या असल्यान...
येत्या आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुका तोंडावर आल्या असल्याने जागवाटपापूर्वीच उमेदवारी मिळवण्यासाठी नेतेमंडळींकडून प्रयत्न सुरु आहेत.
रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवार गटाच्या बड्या नेत्यांनी भेट घेत सातारा-जावळी मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी रविवारी येथील शासकीय विश्रामगृहात खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात जनतेचा पाठिंबा वाढत आहे, त्यामुळे आपल्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळावे, अशी थेट इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या मागणीला पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे. (NCP News )
यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष साधू चिकणे,अमित कदम यांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे साताऱ्याचे कार्याध्यक्ष अमित कदम यांनी रविवारी खासदार शरद पवार यांची येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास कदम हे इच्छुक आहेत. या मागणीचा विचार करावा, अशी मागणी अमित कदम यांनी शरद पवार यांच्याकडे केली. या भेटीनंतर यासंदर्भातील आपली पुरेपूर माहिती मला आहे. या संदर्भात आपण योग्यवेळी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.
COMMENTS