विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाबद्दल बैठका पार पडत आहे. २८८ पैकी १२० ते १३० जागांवर महाविकास आघाडीतील तीनही ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाबद्दल बैठका पार पडत आहे. २८८ पैकी १२० ते १३० जागांवर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांत सहमती झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, येत्या १० दिवसांत जागावाटप पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ( शरदचंद्र पवार ) शरद पवारसाहेब यांनी दिली आहे.
यावेळी राष्ट्रवादीत तिकीटवाटपाचा 'फॉर्म्युला' कसा असणार? जागावाटपानंतर महाविकास आघाडीची पुढील रणनीती कशी असेल? यावरही पवारसाहेबांनी ( Sharad Pawar ) भाष्य केलं आहे. ते बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
शरद पवारसाहेब म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांचा अभ्यास सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्य काहीजण इच्छुकांच्या मुलाखती घेतील. नंतर पक्ष इच्छुकांबाबत निर्णय घेईल."
"तीन पक्ष एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढत आहे. एखादी जागा तीन पक्षांत कुणी लढवावी, याबद्दल विचारविनिमय सध्या सुरू आहे. जागावाटपाबद्दल निर्णय झाला की, तिथे कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय तो-तो पक्ष घेईल. येत्या १० दिवसांत जागावाटप संपेल. त्यानंतर जनतेत जाऊन आपली भूमिका सांगण्यास सहकारी पक्ष सुरूवात करतील," असं शरद पवारसाहेबांनी सांगितलं.
COMMENTS