राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पहिल्यांदाच मागच्या १५ वर्षात पक्षाकडून झालेल्या दोन चुकांबद्दल जाहीरपणे बोलून ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पहिल्यांदाच मागच्या १५ वर्षात पक्षाकडून झालेल्या दोन चुकांबद्दल जाहीरपणे बोलून दाखवलं आहे.
या चुकांबद्दल बोलून तटकरेंनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे
एका वृत्तवाहिनीच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी सुनिल तटकरे आले होते, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या दोन चुकांबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
सुनिल तटकरे नक्की काय म्हणाले ?
'दादांची मुख्यमंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेली नाही, महाराष्ट्राच्या जनतेलाही ते वाटतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही वाटतं, पण आम्ही सगळे वास्तववादी आहोत. महायुतीचं सरकार राज्यात आणायचं हे आम्ही ठरवलं आहे. सरकार आल्यानंतर एकत्रितरित्या बसून त्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्व ठरवेल, ते सगळ्यांना मान्य असेल. आम्हाला वाटतं अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, पण महायुतीचा मुख्यमंत्री होणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला त्यांचं नेतृत्व मुख्यमंत्रिपदावर बसावं, असं वाटणं स्वाभाविक आहे, त्यात गैर काहीच नाही', असं तटकरे म्हणाले.
'आमच्या पक्षाच्या धरसोड वृत्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं मुख्यमंत्रिपद गेलं, नाहीतर २००४ सालीच राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता. कदाचित महाराष्ट्राचं राजकारण पुढच्या काळात वेगळं झालं असतं', अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिली.
'मागच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आमचं म्हणणं होतं की अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद घ्या, त्यावेळीही होऊ शकलं नाही. महाविकासआघाडी म्हणून आम्ही सत्तेत आलो तेव्हा बहुतांश नेत्यांना वाटत होतं की अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद घ्यावं, कारण तेव्हा त्यांचे ५६ आणि माझे ५४ होते. संख्याबळामध्ये फारसा फरक नव्हता. राष्ट्रवादीच्या पुढाकारातून सरकार आलं होतं. संख्याबळाच्या जोरावर पहिला क्लेम उद्धव ठाकरेंना दिला गेला', असं वक्तव्य तटकरेंनी केलं आहे.
'अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद न घेणं ही नक्कीच चूक होती. २००४ मध्ये आम्ही मुख्यमंत्रिपद घेतलं नाही ही चूक होती. तशीच २०१९ मध्ये सत्ता स्थापन करत असताना राष्ट्रवादीने ती अट ठेवलीच पाहिजे होती, असं माझं मत तेव्हाही होतं आणि आताही आहे', असं सुनिल तटकरे थेटपणे बोलले आहेत.
COMMENTS