राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह विविध पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे न...
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह विविध पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेत्यांचे देखील प्रचार, सभा आणि बैठका यांचे सत्र वाढले आहे.
राज्यांमध्ये महायुती व महाविकास आघाडी निर्माण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे यंदाची विधानसभा रंगणार आहे. त्यामुळे उमेदवारांची चाचपणी, पक्षांमध्ये जागावाटप आणि नेत्यांची नाराजीनाट्य सुरु आहे. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या नेत्यांनी केले आहे.
शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत देखील भाष्य केले. मबाविकास आघाडीची जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आली असून त्यांचा संभाव्य फॉर्मुला देखील समोर आला आहे. मात्र महायुतीचा तिढा अद्याप कायम असल्याचे समोर येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे यावेळी तिन्ही पक्ष सामंजस्याची भूमिका घेत आहेत. याबद्दल बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांना तडजोड करावी लागणार, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.
हा तिढा एका बैठकीत सुटणार नाही
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून त्यांनी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर चर्चा पार पडली. याबाबत आमदार शिरसाट म्हणाले, लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपाला उशीर झाला, त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आलेत. मुळामध्ये महायुतीत भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष असल्यामुळे किंवा त्यांचे आमदार जास्त असल्यामुळे त्यांना तडजोड करावी लागणार आहे. जर तडजोड करायची असेल तर विधानसभा निवडणुकीत जागावाटप कशा पद्धतीने करायचं? हा तिढा एका बैठकीत सुटणार नाही. त्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे स्वत: आले. ते हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत" असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.
COMMENTS