विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेच्या तोंडावर मोठी बात...
विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेच्या तोंडावर मोठी बातमी समोर येत आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ओबीसी नेते ईश्वर बाळबुधे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. ईश्वर बाळबुधे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ओबीसी समन्वय पदावर होते, हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ओबीसी नेते ईश्वर बाळबुधे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. ईश्वर बाळबुधे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ओबीसी समन्वय पदावर होते. ते छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जातात. राज्यात ओबीसी आणि मराठा आंदोलने सुरू असतानाच ईश्वर बाळबुधे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्यानं हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ईश्वर बाळबुधे हे तेली समाजाचे तसेच ओबीसी चळवळीतील नेतृत्व असून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते पक्षात कार्यरत आहेत. पक्षाच्या पडतीच्या काळात छगन भुजबळ तुरुंगात असतांना शरद पवारांनी राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी त्यांना दोनदा दिली. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु ते आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.
COMMENTS