Maha Election : "मविआ" च्या त्या ३२ जागांसाठी होणार चढाओढ! | CrimeNama
Loading ...

Maha Election : "मविआ" च्या त्या ३२ जागांसाठी होणार चढाओढ!

  विधानसभा निवडणुकीची तयारी आता सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्षांपासून ए...

 


विधानसभा निवडणुकीची तयारी आता सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनेक वर्षांपासून एकत्रित नांदत असल्याने या दोन्ही पक्षांना परस्परांसमवेत निवडणूक लढविण्याची सवय आहे.

मात्र, राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचा जन्म झाला. ज्यांनी आयुष्यभर एकमेकांना पाण्यात पाहिले त्या काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले. आता विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरे जाताना जागावाटपाचे आव्हान या पक्षांसमोर आहे.


मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या १७ आमदारांच्या विरोधात शिवसेनेने दुसऱ्या क्रमाकांची मते घेतली आहेत. शिवसेनेच्या १५ आमदारांच्या विरोधात काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांच्या वादात अडकलेल्या या ३२ जागांबाबत काय तोडगा निघणार, यावर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे गणित अवलंबून आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, के. सी. पाडवी, झिशान सिद्दिकी, प्रतिभा धानोरकर, संग्राम थोपटे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करून विजय मिळविला होता. त्यामुळे या जागांसाठी काँग्रेस व ठाकरेंची शिवसेना यांच्यात मोठी कसरत होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे, रवींद्र वायकर, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, राजन साळवी यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करून विजय मिळविला होता. यापैकी बहुतांश जण सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. ज्या जागांवर विजय मिळवला त्या जागांवरील दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडणार का? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

शिवसेना पिछाडीवर, 'नोटा' आघाडीवर


राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विश्वजित कदम व धीरज देशमुख यांच्या विरोधात युतीमधून शिवसेनेने उमेदवार दिले होते. या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात शिवसेना पिछाडीवर व 'नोटा' (नॉन ऑफ द अबॉव्ह) आघाडीवर असल्याचे निकालातून समोर आले. सांगली जिल्ह्यातील पलुस कडेगावमधून काँग्रेस उमेदवार विश्वजित कदम यांना एक लाख ७१ हजार ४९७, 'नोटा'ला २० हजार ६३१ तर शिवसेना उमेदवार संजय विभुते यांना आठ हजार ९७६ मते मिळाली. लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांना एक लाख ३५ हजार ६, 'नोटा'ला २७ हजार ५०० तर शिवसेना उमेदवार सचिन देशमुख यांना १३ हजार ५२४ मते मिळाली. कदम-देशमुख यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवारांनी तयारी केली होती. या दोन्ही जागा युतीमध्ये शिवसेनेला गेल्याने भाजप कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता.

पोटनिवडणुकीत जुळले सूत्र


राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असताना काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव व रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाले. या दोन्ही ठिकाणी काँग्रेस (Congress) विजयी झाले. देगलूरमधून जितेश अंतापूरकर व कोल्हापूर उत्तरमधून जयश्री जाधव यांना विजयी करण्यात तेथील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केलेली मेहनत महत्वाची ठरली. पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीप्रमाणे या दोन्ही ठिकाणी भाजपने बेरजेच्या राजकारणाचे प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही.


सुरुवातीला सत्तेसाठी महाविकास आघाडीच्या प्रयोग झाला. नंतर महायुतीचा प्रयोग सुरू झाला. राज्यातील जनतेला 'महायुती'पेक्षा 'महाविकास'चा प्रयोग योग्य वाटल्याचे लोकसभा निवडणूक निकालाने दाखवून दिले. २०१९ मध्ये परस्परांच्या विरोधात लढलेल्या काँग्रेस व शिवसेनेला आता २०२४ च्या जागा वाटपासाठी सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

या ३२ जागा ठरणार महत्त्वाच्या


अक्कलकुवा (जि. नंदुरबार) काँग्रेस : के. सी. पाडवी : ८२७७० वि. शिवसेना : आमशा पाडवी : ८०६७४


मेहकर (जि. बुलडाणा) शिवसेना : संजय रायमुलकर : ११२०३८ वि. काँग्रेस : अनंत वानखेडे : ४९८३६


तिवसा (जि.अमरावती) काँग्रेस : यशोमती ठाकूर : ७६२१८ वि. शिवसेना : राजेश वानखेडे : ६५८५७


ब्रह्मपुरी (जि.चंद्रपूर) काँग्रेस : विजय वडेट्टीवार : ९६२७६ वि. शिवसेना : संदिप गड्डमवार : ७८१७७


वरोरा (जि.चंद्रपूर) काँग्रेस : प्रतिभा धानोरकर : ६३८६२ वि. शिवसेना संजय देवतळे : ५३६६५


नांदेड उत्तर (जि.नांदेड) शिवसेना : बालाजी कल्याणकर : ६२८८४ वि. काँग्रेस : डी. पी. सावंत : ५०७७८


देगलूर (जि.नांदेड) काँग्रेस : रावसाहेब अंतापूरकर : ८९४०७ वि. शिवसेना : सुभाष साबणे : ६६९७४


जालना (जि. जालना) काँग्रेस : कैलास गोरंट्याल : ९१८३५ वि. शिवसेना : अर्जून खोतकर : ६६४९७


मालेगाव बाह्य (जि. नाशिक) शिवसेना : दादाजी भुसे : १२१२५२ वि. काँग्रेस : डॉ. तुषार शेवाळे : ७३५६८

इगतपूर (जि. नाशिक) काँग्रेस : हिरामण खोसकर : ८६५६१ वि. शिवसेना : निर्मला गावित : ५५००६


पालघर (जि. पालघर) शिवसेना : श्रीनिवास वनगा : ६८०४० वि. काँग्रेस : योगेश नम : २७७३५


अंबरनाथ (जि. ठाणे) शिवसेना : बालाजी किणीकर : ६००८३ वि. काँग्रेस : रोहित साळवे : ३०७८९


ओवळा, माजीवडा (जि. ठाणे) शिवसेना : प्रताप सरनाईक : ११७५९३ वि. काँग्रेस : विक्रांत चव्हाण : ३३५८५


कोपरी, पाचपाखडी (जि. ठाणे) शिवसेना : एकनाथ शिंदे : ११३४९७ वि. काँग्रेस : संजय घाडीगावकर : २४१९७


जोगेश्वरी पूर्व, मुंबई उपनगर शिवसेना : रविंद्र वायकर : ९०६५४ वि. काँग्रेस : सुनील कुमरे : ३१८६७


चांदिवली, मुंबई उपनगर शिवसेना : दिलीप लांडे : ८५८७९ वि. काँग्रेस : नसीम खान : ८५४७०


चेंबूर, मुंबई उपनगर शिवसेना : प्रकाश फाटर्पेकर : ५२२६४ वि. काँग्रेस : चंद्रकांत हांडोरे : ३४२४६


कलिना, मुंबई उपनगर शिवसेना : संजय पोतनिस : ४३३१९ वि. काँग्रेस : जॉर्ज अब्राहम : ३८३८८

वांद्रे पूर्व, मुंबई उपनगर काँग्रेस : झिशान सिद्दिकी : ३८३३७ वि. शिवसेना : विश्वनाथ महाडेश्वर : ३२५४७


धारावी, मुंबई काँग्रेस : वर्षा गायकवाड : ५३९५४ वि. शिवसेना : अशिष मोरे : ४२१३०


मुंबादेवी, मुंबई काँग्रेस : अमीन पटेल : ५८५९२ वि. शिवसेना : पांडुरंग सपकाळ : ३५२९७


महाड (जि. रायगड) शिवसेना : भरत गोगावले : १०२२७३ वि. काँग्रेस : माणिक जगताप : ८०६९८


पुरंदर (जि. पुणे) काँग्रेस : संजय जगताप : १३०७१० वि. शिवसेना : विजय शिवतारे : ९९३०६


भोर (जि. पुणे) काँग्रेस : संग्राम थोपटे : १०८९२५ वि. शिवसेना : कुलदीप कोंडे : ९९३०६


संगमनेर (जि. नगर) काँग्रेस : बाळासाहेब थोरात : १२५३८० वि. शिवसेना : साहेबराव नवले : ६३१२८


श्रीरामपूर (जि. नगर) काँग्रेस : लहु कानडे : ९३९०६ वि. शिवसेना : भाऊसाहेब कांबळे : ७४९१२


उमरगा (जि. धाराशिव) शिवसेना : ज्ञानराज चौगुले : ८६७७३ वि. काँग्रेस : दत्तू भालेराव : ६११८७

धाराशिव (जि. धाराशिव) शिवसेना : कैलास पाटील : ८७४८८ वि. राष्ट्रवादी : संजय निंबाळकर : ७४०२१


राजापूर (जि. रत्नागिरी) शिवसेना : राजन साळवी : ६५४३३ वि. काँग्रेस : अविनाश लाड : ५३५५७


करवीर (जि. कोल्हापूर) काँग्रेस : पी. एन. पाटील : १३५६७५ वि. शिवसेना : चंद्रदीप नरके : ११३०१४


कोल्हापूर उत्तर (जि. कोल्हापूर) काँग्रेस : चंद्रकांत जाधव : ९१०५३ वि. शिवसेना : राजेश क्षीरसागर : ७५८५४


हातकणंगले (जि. कोल्हापूर) काँग्रेस : राजू आवळे : ७३७२० वि. शिवसेना : डॉ. सुजित मिणचेकर : ६६९५०

COMMENTS

Name

Agriculture,72,Ahmednagar,61,Amaravati,13,Aurangabad,30,Breakin,1,Breaking,2878,Buldhana,12,Chandrapur,1,Cooking,2,Crime,666,Dhule,9,Entertainment,52,Gadchiroli,5,Health,430,India,302,Jalgaon,25,Jalna,9,Kolhapur,12,Lifestyle,262,Maharashtra,1306,Mumbai,278,Nagpur,28,Nashik,32,Politics,460,Pune,1651,Raigad,15,Ratnagiri,16,Sangali,20,Satara,30,Sindhudurg,4,Solapur,18,Sport,64,Technology,33,World,55,महाराष्ट्र,1,
ltr
item
CrimeNama: Maha Election : "मविआ" च्या त्या ३२ जागांसाठी होणार चढाओढ!
Maha Election : "मविआ" च्या त्या ३२ जागांसाठी होणार चढाओढ!
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgt2FBdeJPG2phooTlcNbkwm-g6xs3w6m-47awBwhGmecqYh7hzHUhe2vKxxl4XyqIIU0sfuFL4yXeaM19S090sfwSRNLtQfh-6ivGpABTH4J7wEvhxXg8yWwSKVSNX8fGLukn8x4-3e2EX2_EXvqmy6M_EPkTOXSrgXAd8k5CH7OX4lHbfJzHP47DLtQQ/s320/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80_20240923_133630_0000.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgt2FBdeJPG2phooTlcNbkwm-g6xs3w6m-47awBwhGmecqYh7hzHUhe2vKxxl4XyqIIU0sfuFL4yXeaM19S090sfwSRNLtQfh-6ivGpABTH4J7wEvhxXg8yWwSKVSNX8fGLukn8x4-3e2EX2_EXvqmy6M_EPkTOXSrgXAd8k5CH7OX4lHbfJzHP47DLtQQ/s72-c/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80_20240923_133630_0000.png
CrimeNama
https://www.crimenama.com/2024/09/maha-election.html
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/
https://www.crimenama.com/2024/09/maha-election.html
true
402401738459984752
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content