राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील यांचा विजय निश्चित असून...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील यांचा विजय निश्चित असून तासगावची सीट आल्यात जमा आहे, असा विश्वास व्यक्त केला.
शिवाय यावेळी त्यांनी आर.आर पाटील (R.R Patil) यांचे पूत्र रोहित पाटील यांना या निवडणुकीची चिंता करू नका असा, सल्ला देताना एक विनंती देखील केली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे एका पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानिमित्त शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी रोहित पाटलांचा विधानसभेला विजय फिक्स असल्याचं भाकीत केलं. ते म्हणाले, "आता राज्यातील वातावरण बदललं आहे. रोहितदादांनी सांगितलं की राष्ट्रवादीचा पहिला आमदार तासगाव मतदारसंघातून निवडून येणार आणि आलाच पाहिजे. डोळे झाकून तो निवडून येईल. त्यामुळे तुम्ही आता महाराष्ट्रातही वेळ द्यायला हरकत नाही.
कारण तुमच्यात आणि विरोधकांच्यात फार अंतर आहे, तुम्ही त्याची काही चिंता करु नका. तुमची सीट मोजल्यात जमा आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की, पक्ष वाढवण्यासाठी महाराष्ट्रात फिरले पाहिजे."
COMMENTS