महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ खडसेंकडे असलेल्या सीडीची फार चर्चा झाली होती. भाजप सोडल्यानंतर एकनाथ खडसेंनी भाजप नेत्यांवर टीका करताना म्...
महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ खडसेंकडे असलेल्या सीडीची फार चर्चा झाली होती. भाजप सोडल्यानंतर एकनाथ खडसेंनी भाजप नेत्यांवर टीका करताना म्हटले होते की, त्यांचेकडे ईडी असेल तर माझ्याकडे सीडी आहे.
वेळ आल्यावर आपण ती सीडी बाहेर काढणार. मात्र, ही सीडी कधी बाहेर आली नाही.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना खडसे यांनी आपल्याकडे खरचं सीडी होती का? याचे उत्तर दिले आहे. खडसे म्हणाले, ते ईडी म्हणाले म्हणून मी सीडी म्हणालो. यमक जुळवलं. मात्र माझ्याकडे काही कागदपत्रं, व्हिजव्हल (क्लिप) होते. ते मी भाजपच्य वरिष्ठ नेत्यांना देखील दाखवले.
त्या क्लिपमध्ये मुलीसोबत चालणारे चाळे वरिष्ठांना दाखवले. कोणाचे आहेत ते चाळे त्यांचे नाव सांगणार नाही', असे देखील एकनाथ खडसे म्हणाले.
माझ्या मोबाईलमधून ते कुठं गेलं, कसं डिलिट झालं हे मला देखील समजलं नाही. पण मी शपथेवर सांगतो की माझ्याकडे होतं. माझी मुक्ताईवर श्रद्धा आहे. मुक्ताईची शपथ घेऊन सांगतो ते माझ्याकडं होतं. कस गेलं हे मला माहीत नाही, असे देखील खडसे म्हणाले.
COMMENTS