प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) अष्टविनायक गणपती तिर्थक्षेत्रापैकी सह्याद्री पर्वत रांगेच्या लेण्यात वसलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री ...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
अष्टविनायक गणपती तिर्थक्षेत्रापैकी सह्याद्री पर्वत रांगेच्या लेण्यात वसलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थानास महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत विकास कामांकरीता एक कोटी नव्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांची तरतुद करण्यात आलेली आहे. तसा शुक्रवार दि. ०४ सप्टेंबर २०२४ रोजी शासन निर्णय झालेला असुन त्यानुसार देवस्थान परीसरात भक्त निवास, महिला व पुरुष स्वच्छतागृह उभारणी होणार असल्याची माहीती देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री क्षेत्र लेण्याद्री येथे येणार्या भाविक व पर्यटकांची संख्या तसेच देवस्थानचे महत्व लक्षात घेवून देवस्थानास सन २०१८ मध्ये राज्य शासनाकडून ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा जाहीर करण्यात आला आहे. ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त असणार्या देवस्थानांना विकास कामांकरीता राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून निधी उपलब्ध करुन दिला जातो. यामुळे देवस्थानाचे सर्वांगीण विकास होण्यास व विविध विकास कामांना चालना मिळण्यास खुप मोठी मदत होते. श्री क्षेत्र लेण्याद्री येथे येणार्या भाविक व पर्यटकांकरीता देवस्थानने विविध मुलभूत सोयी सुविधा केलेल्या आहेत. तसेच देवस्थानच्या वतीने समाजोपयोगी सामाजिक उपक्रम राबविले जातात. परंतू भाविक व पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेवून देवस्थान ट्रस्टने विकास कामांकरीता निधी उपलब्ध करुन देणेबाबतची प्रस्ताव फाईल तयार करुन दि. ३० मार्च २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद यांच्यामार्फत राज्य शासनाचे ग्रामविकास विभागाकडे दाखल केली होती. त्यास मान्यता देवून दि. ०४ सप्टेंबर २०२४ रोजीचे शासन निर्णयानुसार श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थान परीसरात भक्त निवास, महिला व पुरुष स्वच्छतागृह उभारणी करीता एक कोटी नव्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये निधीची तरतुद करण्यात आलेली आहे. या सुविधांचा येथे येणार्या भाविक व पर्यटकांना निश्चीत चांगला उपयोग होईल. श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानास विकास कामांकरीता ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्र योजनेतंर्गत निधी मंजुर केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे वतीने आभार व्यक्त करण्यात आले. अशी माहीती देवस्थानचे अध्यक्ष संजय ढेकणे व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
COMMENTS