मविआच्या बैठकीत जागावाटपासंदर्भात काहीही दावा होत असला तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस तब्बल १५० जागा लढवणार आहे, तर शरद पवार...
मविआच्या बैठकीत जागावाटपासंदर्भात काहीही दावा होत असला तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस तब्बल १५० जागा लढवणार आहे, तर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस ८८ आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ठाकरे गट ९५ जागा लढवण्याचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समोर येत आहे.
याशिवाय ठाकरे गट मुंबईत २३ जागा लढवेल यावरही बैठकीत शिक्कामोर्तबच करण्यात आल्याचे या बैठकीला उपस्थित असलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले आहे. (Congress likely to contest 150 seats, Sharad Pawar group 88 and Thackeray group 95 seats in assembly elections)
नेत्याने म्हटले की, मविआच्या बैठकीत ठाकरे गटाच्या उपस्थित नेत्यांनी उद्धव ठाकरे हेच बनवतील असा हट्ट अद्याप सोडला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम्ही कमी जागांवर आता तडजोड करण्यास तयार असल्याचे मित्र पक्षांच्या नेत्यांना सांगण्यात आले आहे. आणखी दोन दिवस हे बैठकांचे सत्र चालणार आहे. खरंतर बैठकीला येण्यासाठीही काँग्रेसचे राज्यातील नेते तयार नव्हते. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकाही केली होती, याची आठवणही ज्येष्ठ नेत्याने यावेळी करून दिली.
मविआतील नेत्यांनी २८८ जागांचा आढावा घेतला असून त्यामध्ये काँग्रेस विदर्भात मजबूत स्थितीत आहे. तर लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश हाती न आल्याने ठाकरे गट मुंबईसह कोकणात तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रसह मराठवाड्यात आपली ताकद दाखवण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये मविआलाच बहुमत मिळेल, असे प्रास्ताविक करून बैठकीला सुरूवात झाली. यावेळी काँग्रेसने तब्बल ११५ जागांवर दावा करतानाच केवळ राहुल गांधींच्या आदेशानुसार ते १५० जागांवर थांबतील, असे काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी ठामपणे स्पष्ट केल्याची माहितीही या नेत्याने दिली.
लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्याने काँग्रेसच्या राज्यातील सर्वच नेत्यांना फार महत्त्व आले असून आता तेही तारखांवर तारखा देत आहेत. त्यामुळेच जागावाटप बैठकीची तारीख, वेळ आणि ठिकाण आधी कळवूनही काँग्रेसचे नेते वेळेवर पोहोचत नाहीत. त्यामुळे संजय राऊत बैठकीत स्पष्टच म्हणाले की, काँग्रेस पक्ष सध्या खूपच व्यग्र झाल्याने आम्ही हे सगळे संपवावे, यासाठी आज त्यांना बोलावले आहे. तरीही ते तारखांमागून तारखा देत आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपली तीव्र नाराजी बोलून दाखवली.

वास्तविक ६ ते ८ ऑगस्ट दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेत मुख्यमंत्रिपदासाठी माझाच चेहरा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर प्रचारात ही बाब समोर आणली जाईल, असे त्याचवेळी सांगण्यात आले होते. त्यानंतर लगेच शरद पवारांनीही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आताच जाहीर करण्याची घाई नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र त्यावेळी शांत झालेला ठाकरे या बैठकीत सुरुवातीपासूनच आक्रमक झाल्याचे दिसून आल्याचा गौप्यस्फोटही ज्येष्ठ नेत्याने अधिक माहिती सांगताना केला.
COMMENTS