वार्ताहर :- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये आदिवासी समाजाच्या प्रमुख चार जमाती वा...
वार्ताहर :- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये आदिवासी समाजाच्या प्रमुख चार जमाती वास्तव्य करतात. त्यामध्ये कोळी महादेव, ठाकर, भिल्ल व कातकरी या जमाती आहेत. पूर्वीपासूनच आदिवासी समाज हा सोयी सुविधांपासून व शाश्वत विकासापासून वंचित राहिलेला आहे. आदिवासी समाजाची मुलं आता कुठेतरी शिकायला लागली परंतु शासनाने त्यांच्या असणाऱ्या योजना बंद करण्यास सुरुवात केलेली आहे. पेसाभरती असेल, बोगस घुसखोरी असेल, सेंट्रल किचन पद्धती असेल असे अनेक प्रश्न आदिवासी समाजाला भेडसावत आहे.
या प्रश्नांवर योग्य ते निर्णय घेण्यासाठी तसेच या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जुन्नर तालुक्याच्या सर्व आदिवासी जमाती एकत्र येऊन बिरसा ब्रिगेड च्या वतीने आदिवासी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपल्या सर्व बांधवांना कळविण्यात येते की रविवार दिनांक 15/09 2024 रोजी सोमतवाडी आश्रम शाळे समोर, जुन्नर आपटाळे रोड, भवानी लॉन्स मंगल कार्यालय या ठिकाणी आदिवासी हक्क व अधिकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेसाठी बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष व आदिवासी समाजाचा बुलंद आवाज आदरणीय इंजिनिअर सतीश दादा पेंदाम मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सर्व बांधवांनी या परिषदेस अवश्य उपस्थित राहावे असे आपणास आवाहन करण्यात येत आहे.
COMMENTS