विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. निवडणुकी आधी दोन पक्ष फुटले. राजकीय घरांमध्ये फुट पडली. त्यात आता आणखी...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. निवडणुकी आधी दोन पक्ष फुटले. राजकीय घरांमध्ये फुट पडली. त्यात आता आणखी एक भर पडली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
मी आजारी असताना फडणवीसांनी दबाव टाकून आपले घर फोडले असा आरोप त्यांनी केला आहे. लोकसभेच्या तोंडावर मधुकरराव चव्हाण यांचा मुलगा सुनिल चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. त्यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
मधुकरराव चव्हाण हे पुन्हा एकदा तुळजापूर विधानसभा मतदार संघातून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. सध्या त्यांचे वय 90 वर्षाचे आहेत. सध्या मतदार संघात त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. यावेळी येवती इथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की फडणवीसांनी दबाव टाकून आपले घर फोडले. याचे पाप त्यांना कधी ना कधी फेडावेच लागेल. असे विधान माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकी वेळी आपण आजारी होतो. त्यावेळी सुनील चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडले गेले असा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर पक्षात आपल्याकडे संशयाने पाहीले जात होते असेही चव्हाण म्हणाले.
धाराशिव तालुक्यातील येवती येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री चव्हाण यांनी मुलाच्या भाजप प्रवेशाचा खुलासा केला आहे. चव्हाण म्हणाले भाजप काँग्रेसने लावलेले ग्रामीण भागाच्या विकासाचे रोपटे तोडण्याचे काम करत आहे. तसेच आमचे घर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोडले. आम्हाला अस्वस्थ करून आमची बदनामी केली. याचे दुःख आम्हाला आहे. त्यामुळे त्यांनी केलेले हे पाप कधी ना कधी त्यांना फेडावे लागेल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप आणि फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.
COMMENTS