प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर ) समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल या सी बी एस ई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्...
प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे ( सर )
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल या सी बी एस ई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक जवळपास ३१० मुर्तींची निर्मिती केली व त्याचे प्रदर्शन नुकतेच शाळेमध्ये भरविण्यात आले होते.
या पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाडूची माती त्याचबरोबर लाकडाचा भुसा,कागदाचा लगदा तसेच झाडांच्या पानांचा सुद्धा उपयोग केला.
तसेच या मूर्ती रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला होता.मूर्तीच्या सजावटीसाठी विद्यार्थ्यांनी जे साहित्य वापरले ते सुद्धा नैसर्गिक फुले,पाने,कागद,धागे,कापड,लाकूड,बांबू अशा प्रकारचे होते.या पर्यावरणपूरक मुर्ती निर्माण करून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.गणेश मूर्ती बनवण्यासाठी समर्थ गुरुकुलच्या कलाशिक्षका दिप्ती चव्हाण व पुजा भुजबळ यांनी परिश्रम घेतले.समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतिश कुऱ्हे,पर्यवेक्षक एच पी नरसुडे,सखाराम मातेले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला.विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,संचालिका सारिकाताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी सदर प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे कौतुक केले.
COMMENTS