आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था राष्ट्रीय पर्यटन विकास सांस्कृतिक कला महोत्सव च्या वतीने हिवाळी अधिवेशन पिंपरी चिंचवड मोरे स...
आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था राष्ट्रीय पर्यटन विकास सांस्कृतिक कला महोत्सव च्या वतीने हिवाळी अधिवेशन पिंपरी चिंचवड मोरे सभागृह येथे आज दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगनाथजी नाईकडे सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र राज्य अधिवेशन उद्घाटक श्रीमान विठ्ठल रावजी जाधव विशेष पोलीस निरीक्षक महाराष्ट्र राज्य व विशेष सन्मान अतिथी आणि सर्व पर्यावरण मित्र संस्थेतील पदाधिकारी तसेच ही संस्था 22 देशात कार्यरत असून जसे युगांडा देश श्रीलंका देश झांबिया देश बांगलादेश इत्यादी देशांमध्ये ही संस्था कार्यरत असून प्रत्येक देशामधील सर्व पदाधिकारी आज कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व देशातील पदाधिकाऱ्यांचा सन्मान आणि पुरस्कार वितरण सोहळा आज या हिवाळी अधिवेशन महोत्सवात करण्यात आला तसेच बुलढाणा जिल्हा येथील शेगाव येथे सामाजिक कार्य करत असलेल्या शितलताई शेगोकार यांना सेवा रत्न पुरस्काराने या हिवाळी अधिवेशन सोहळ्यामध्ये सन्मानित करण्यात आले या पुरस्काराने त्यांच्याकडे सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या पुरस्काराचे श्रेय ते त्यांच्या पर्यावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री देव तांबे सर व त्यांचे आई-वडील यांना देत आहे पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की समाजसेवा हीच ईश्वर सेवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे प्रत्येकाने एक तरी झाड लावावे एक झाड 10 मुला समान अशा घोषणा देत त्यांनी ही जनजागृती करून समाजामध्ये झाडे लावा झाडे जगवा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या आज समाजात करत आहेत त्यांच्या या पुरस्काराने त्यांचे आई-वडील त्यांचे आप्तेष्ट सर्वीकडे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
COMMENTS