विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा धक्का दिला आहे. कारण...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा धक्का दिला आहे. कारण त्यांचे दाजी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाने नांदेड जिल्ह्यात काँग्रेसची मोठी ताकद वाढणार आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपाठोपाठ जर विधानसभेलाही जिल्ह्यात यश मिळाले नाही तर अशोक चव्हाण यांची ताकद घटू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी शुक्रवारी मुंबईतील टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
भास्करराव पाटील खतगावकर हे माजी मुख्यमंत्री, राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या बहिणीने पती आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का देऊन अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत भास्करराव पाटील खतगावकर, त्यांच्या सुनबाई डॉ. मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह काँग्रेसच्या अनेकांनी भाजपचे कमळ हाती घेतले होते.
COMMENTS