प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समितीद्वारे आदर्श पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नॅशनल लायब्ररी वांद्रे, मुंबई येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमा...
प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समितीद्वारे आदर्श पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नॅशनल लायब्ररी वांद्रे, मुंबई येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.बाळासाहेब तोरस्कर (ज्येष्ठ साहित्यिक),उद्घाटक मा.डॉ.ख.र. मावळे (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती), प्रमुख पाहुणे मा.डॉ.जी डी.यादव (अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था),मा.डॉ.डेरीक एंजल्स (नासा शास्त्रज्ञ), मा.डॉ.सुकृत खांडेकर (संपादक दैनिक प्रहार), मा.प्रमोद महाडिक (नॅशनल लायब्ररी), मा.भानुदास केसरे, मा.रामकृष्ण कोळवणकर, मा.राजेश कांबळे तसेच डॉ. गॅन्सी अल्बुकर्क या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्वागताध्यक्ष मा.प्रा.नागेश हुलवळे (अध्यक्ष वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई), यांना उत्कृष्ट अनुवादक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विविध क्षेत्रातील १८७ पुरस्कारार्थ्यांपैकी ते एकमेव अनुवादक आहेत. वर्ल्ड पार्लमेंटचे अध्यक्ष लेखक डॉ. ग्लेन टी मार्टीन यांच्या पृथ्वी संघराज्य संविधानाचे भारतीय भाषांत प्रथम मराठीमध्ये करणाऱ्या संघात प्रा. नागेश हुलवळे यांची जबाबदारीची भुमिका होती . या अनुवादासाठी त्यांना डॉ. ग्लेन टी मार्टीन यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विश्वस्नेही पुरस्काराने गौरवण्यात आले आहे . प्रा. नागेश हुलवळे यांचे स्वच्छतेतून समृद्धीकडे या पुस्तकाचा विनामुल्य इंग्रजी अनुवादित पुस्तक प्रकाशित झाला आहे . त्याचप्रमाणे त्यांची व्यावसायिक अनुवादीत पुस्तकेही प्रकाशित करण्यात आली आहे . त्यांचा आनंदाच्या लहरी हा हायकू काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे . त्यांनी आम्ही मावळे शिवरायांचे या काव्यसंग्रहाचेही संपादन केले आहे . त्यांचे इतरही प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आले आहे . त्यांनी कोरोना काळात संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन केलेआहे . त्यांनी " परिक्षेला आनंदाने सामोरे जाऊ या " हि व्याख्यानमाला दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यासाठी राबवली आहे . अनेक शैक्षणिक उपक्रमांत ते रुहभाग घेतात . वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबईचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत . साहित्यिक दैनिक वर्ल्ड व्हिजन टाईम्स मुंबईचे संस्थापक संपादक म्हणून काम करत आहेत . सध्या ते समर्थ रामदास एज्युकेशन सोसायटीचे श्री समर्थ नाईट हारस्कूल अंधेरी पूर्व येथे कार्यरत आहेत . प्रा. नागेश हुलवळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील १८७ पेक्षा अधिक मान्यवरांना गौरविण्यात आले आहे . मा.प्रा.नागेश हुलवळे , मा.रमेश पाटील लेखक कोल्हापूर,मा.प्रमोद सूर्यवंशी संपादक मुंबई, मा.योगेश हरणे पुणे व आयोजक समितीचे सर्व सदस्य यांनी हा सोहळा खूप मेहनतीने आयोजित केला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता पाखले , वैशाली पाखले, योगेश गोतरणे यांनी केले . विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
COMMENTS