प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातील उदापूर गावचे जेष्ठ साहित्यिक राष्ट्रपती पु...
प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातील उदापूर गावचे जेष्ठ साहित्यिक राष्ट्रपती पुरस्कार विजेते खंडू माळवे उर्फ डॉ खं र माळवे -खरमा यांना या अगोदर सलग चौथ्यांदा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे याही वर्षी जीवन गौरव प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार दैनिक प्रहार संपादक सुकृत खांडेकर यांचेहस्ते नुकताच देण्यात आला.ऐतिहासिक नॅशनल लायब्ररी मुंबई बांद्रा पश्चिम येथे देण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवी बाळासाहेब तोरसकर यांनी भुषविले उदघाटक मां प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार डॉ खं र माळवे -खरमा यांचेहस्ते करण्यात आले स्वागताध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड व्हिजन टाईम्सचे अध्यक्ष प्रा नागेश हुलवळे यांनी आपल्या संविधानाच्या उदेशिकेचे वाचन केले यावेळी रविवार दि २५/०८/२४रोजी प्रमुख पाहुणे म्हणून नासा शास्त्रज्ञ डॉ डेरिक एंजल्स पद्मश्री डॉ जी.डी.यादव(अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था भारत सरकार दै प्रहार संपादक सुकृत खांडेकर बी.पी.ई.हायस्कुल बांद्रा मुख्याध्यापक भानुदास केसरे नॅशनल लायब्ररीचे सचिव प्रमोद महाडक, उद्योजक राजेश कांबळे आणि वूमेन्स इंडिपेंडेड फोरएहरच्या संस्थापिका डॉ नॅन्सी अलबुकर्क रामकृष्ण कोळवणकर उपस्थिती लाभली यावेळेस डॉ खं र माळवे -खरमा यांना साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच भारत सरकार व महाराष्ट्र शासन पुरस्कार तसेच निमशासकीय पुरस्कार यादी प्राप्त आहे नुकताच साहित्य साधना पुरस्कार मान्यवरांचे हस्ते स्मृतिचिन्ह व फेमगौरव पत्र, स्मरणिका,अधिक विषेशांक कवी सरकार विलास पाटील यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे एकूण शंभर पुस्तके लिखित एकाच वेळी प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे या अगोदर महाराष्ट्र राज्य मराठी साहित्य संस्कृती मंडळाने काव्यसंग्रह "चाळणीवाला"२०१३ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मंत्रीमंडळ यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आले आजवर ५००० पाचहजार कविता (मराठी हिंदी) लिहून वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहे महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड, डायमंड बुक ऑफ रेकॉर्ड,OMG बुक ऑफ रेकॉर्ड,भारत बुक ऑफ रेकॉर्ड, हिंदूस्थान बुक ऑफ रेकॉर्ड, सर्वोच्च गिणिज बुक ऑफ रेकॉर्ड करण्याचा मानस आहे या सर्व बाबींचा विचार करून भारत सरकारने डाक विभाग पाच रूपयांचे स्टॅम्प टिकिट जारी केले २०१५आजवर गीत,लावणी,शाहिरी पोवाडे, बालगीते,प्रेमविरापासून तेसंतसाहित्यापर्यंत सामावेश आहे त्याचप्रमाणे बालगीत "अंगाईत" प्रकाशित आहे बाळासाहेब बेल्हेकर तमाशा मंडळ गीत लावणी गात आहेत हा पुरस्कार माझा नसुन सर्व चाहते वर्ग व साहित्यिक कवी संपादक यांचा आहे असे डॉ खं र माळवे यांचे मत आहे त्यांनी आजवर हिंदी मराठी इंग्रजी साहित्यात त्यांचें अनमोल असे विचार मांडून समाजप्रबोधन करीत आपल्या जल्मभूमि कर्मभूमीत आणि महाराष्ट्राच्या मातीत आपल्या विचाराने देशाच्या जडणघडणीत सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत आपल्या कर्मभूमीत आपण विविध विषयांवर लेखन करून तळागाळातील जनतेशी नाळ जोडून समाजाच्या विविध पैलूचा ग्रामीण जीवनातील शैलीचा मागोवा घेत समाज परिवर्तनासाठी आपण जी का जपली आहे या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र राज्य प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती सदस्य प्रा नागेश हुलवळे, रमेश पाटील व प्रमोद सुर्यवंशी ,योगेश हरणे,यांनी केले तर सुत्रसंचलन योगीता पावले यांनी केले शेवटी राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.
COMMENTS