सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांची जोरदार तयारी सुरु असून आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून बैठकांचे सत्र राबवण्यात येत आहेत. दरम्यान, महाविक...
सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांची जोरदार तयारी सुरु असून आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून बैठकांचे सत्र राबवण्यात येत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीचा (मविआ) जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे.
महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणूकीत काँग्रेस सर्वाधिक म्हणजेच १०० ते १०५ जागा लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर उबाठा गट ९५ ते १०० जागा आणि शरद पवार गट ८५ ते ९० जागा लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीमध्ये १२५ जागांबाबत कुठलीही अडचण नसून तिन्ही पक्षांचं एकमत झालं आहे, अशी माहिती दिली होती. मात्र, दुसरीकडे मुंबईतील जागांसाठी मविआत रस्सीखेच सुरु असल्याचीही माहिती पुढे आली होती.
त्यानंतर आता महाविकास आघाडीचा जागावाटपाचा नवा फॉर्म्युला पुढे आला आहे. त्यानुसार, काँग्रेस १०० ते १०५, उबाठा ९५ ते १०० आणि शरद पवार गट ८५ ते ९० जागा लढण्याची शक्यता आहे. परंतू, मुख्यमंत्रीपदावरून मात्र अद्यापही मविआत वाद सुरु असल्याचं बोललं जातं.
COMMENTS