जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे,जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना व विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही.जे. इंटरनॅश...
जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे,जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना व विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही.जे. इंटरनॅशनल स्कूल नगदवाडी वडगाव कांदळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जुन्नर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.
या स्पर्धांमध्ये समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा १९ वर्षाखालील वयोगटातील मुले व मुली दोन्ही संघ उपविजयी झाले. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्तम खेळाचे प्रदर्शन केले व यश संपादन केले, अशी माहिती समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ.वैशाली आहेर मॅडम यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा संचालक श्री.एच.पी. नरसुडे, क्रीडा शिक्षक राजाभाऊ ढोबळे, प्रा.सुरेश काकडे, प्रा.किर्ती थोरात, प्रा.ज्ञानेश्वर जाधव, प्रा.संतोष पोटे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.वसंतराव शेळके, उपाध्यक्ष श्री.माऊलीशेठ शेळके, सचिव श्री.विवेक शेळके,विश्वस्त श्री.वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.स्नेहलताई शेळके यांनी अभिनंदन केले.
COMMENTS