महाराष्ट्र राज्यामध्ये वारंवार मातंग समाजावरती अन्याय आणि अत्याचार होत आहेत. ही गोष्ट निंदनीय आहे. मातंग समाज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबे...
महाराष्ट्र राज्यामध्ये वारंवार मातंग समाजावरती अन्याय आणि अत्याचार होत आहेत. ही गोष्ट निंदनीय आहे. मातंग समाज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा समाज असल्यामुळे अजूनही संयम ठेवून आहे. मातंग समाजावरती अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या गुंडांनी यापुढे मातंग समाजाकडे वाकडी नजर ही करून बघू नका अन्यथा जशास तसे उत्तर देण्यास सज्ज आहोत. मातंग समाजाच्या यापुढे नादाला लागाल तर याद राखा असा खणखणीत इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाच्या युवकांना कार्यकर्त्यांना मारहाण करणे, धमकावणे अशा घटना वारंवार घडत आहेत. नुकतेच सांगली जिल्ह्यातील बहे येथील देवकर या मातंग समाजाच्या कार्यकर्त्याला डोळ्यात मिरची पूड टाकून करण्यात आलेली मारहाण, राहुरी तालुक्यातील मातंग समाजाच्या कुटुंबावरती केलेला प्राण घातक हल्ला या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेल्या पत्रकात हा इशारा दिला आहे.
यावेळी विश्वास मोहिते यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मातंग समाजावर ती वारंवार होत असलेला अन्याय ही निंदनीय बाब आहे. मातंग समाज हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानणार आहे म्हणूनच कायदा हातात घेत नाही. संयमी आहोत याचा अर्थ भित्राट नव्हे. याचा विचार या अन्य करणाऱ्या गुंडांनी करावा, आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. सांगली जिल्ह्यातील बहे येथील घटना तसेच राहुरी तालुक्यातील मातंग समाजाच्या कुटुंबावरती झालेला हल्ला या घटनेची मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी गंभीरतेने दखल घेऊन संबंधित दोषी आरोपींवरती कठोरात कठोर करण्याचे कारवाईची निर्देश पोलिसांना द्यावेत अशी मागणी ही विश्वास मोहिते यांनी केली आहे.
COMMENTS